Clove Benefits : निरोगी राहण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय नेहमीच करत असतात. कारण आधीपेक्षा लोक आता आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. पण अजूनही असे काही लोक आहेत जे आरोग्याची योग्य ती काळजी घेत नाहीत. अशात त्यांना हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करावे लागतात. तुम्हीही अशा लोकांपैकी असाल आणि तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर रोजच्या आहारात थोडे बदल करून तुम्ही हेल्दी राहू शकता. रोज जर तुम्हाला एक छोटीशी दिसणारी लवंग खाल तर काही दिवसातच तुम्हाला कितीतरी फायदे दिसतील.
सामान्यपणे जास्तीत जास्त लोक लवंगचा वापर एखाद्या पदार्थाची टेस्ट वाढवणे, चहात टाकणे यासाठी करतात. पण अनेक हे माहीत नसतं की, लवंगमध्ये भरपूर औषधी गुण असतात. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जर तुम्ही रोज एक लवंग खाल्ली तर अनेक गंभीर समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते. एका रिसर्चनुसार, नियमितपणे लवंग खाल्ल्यास शरीराची इम्युनिटी वाढते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. अशात लवंग खाऊन काय काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स
लवंगमध्ये फ्लेवोनॉइड, फिनोलिक, यूजेनॉलसारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे अॅंटी-ऑक्सिडेंट्स सेल्सचा फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतात. शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करतात आणि ऑक्सिडेटिव स्ट्रेसही कमी करतात. नियमितपणे लवंग खाल्ल्यानं हृदयासंबंधी अनेक समस्या, कॅन्सर आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका कमी होतो.
इन्फेक्शनपासून बचाव
जर तुम्ही रोज लवंग खाल तर यातून अॅंटी-सेप्टिक, अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल इत्यादी तत्व मिळतात. या तत्वांमुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. लवंगाच्या तेलानं शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स वाढण्यासही मदत मिळते. लवंग खाल्ल्यास ई कोली सारख्या नुकसानकारक बॅक्टेरियापासून सुरक्षा मिळते.
दातांसाठी फायदेशीर
लवंग नियमित खाल्ल्यास तुमच्या दातांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासही मदत मिळते. तोंडासंबंधी अनेक उत्पादनांमध्ये लवंगचा वापर केलेला असतो. यात असे गुण असतात जे दाताचं दुखणं कमी करतात आणि तोंडातील नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करतात. रिसर्चमधून हेही समोर आलं आहे की, लवंगाच्या तेलाचा वापर करून दातांसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते.
लिव्हरची सफाई
लवंग खाणं लिव्हरच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतं. लवंग खाल्ल्यानं नवीन सेल्स तयार करण्यास मदत मिळते आणि लिव्हर डिटॉक्स करण्यासही मदत मिळते. बरेच अॅक्टिव इन्ग्रेडिएन्ट जसे की, थायमोलनं लिव्हरला सुरक्षा मिळते. जर तुम्हाला लिव्हरसंबंधी काही समस्या असेल तर रोज एक लवंग नक्की खावी.
ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल
जर तुम्ही प्री डायबिटिक किंवा डायबिटीसनं ग्रस्त असाल तर तुमच्यासाठी लवंग रामबाण उपायासारखी ठरते. रोज एक लंवग खाल तर ब्लड शुगल लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. लवंग इन्सुलिन नावाचं हार्मोन कंट्रोल करण्यास मदत करते. तसेच लवंग खाल्ल्यास कोलेस्टेरॉल लेव्हल कंट्रोल करण्यासही मदत मिळते. नियमितपणे जर लवंग खाल तर भविष्यात टाइप २ डायबिटीस होण्याचा धोकाही कमी होतो.
तोंडाची दुर्गंधी होईल दूर
वेगवेगळ्या कारणांनी तोंडाची दुर्गंधी येते. अशात लोक तुमच्यापासून दूर पळतात. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. मात्र, केवळ लवंगच्या मदतीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
हाडं होतील मजबूत
लवंग हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर हाडं कमजोर असतील तर तुम्ही सकाळी झोपेतून उठून दोन लवंग चावून खाव्यात. यात मॅगनीज भरपूर असतं. ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.