Soaked Walnuts Benefits: ड्रायफ्रूट्समधील अक्रोडला ब्रेन फूडही म्हणतात. अक्रोड आरोग्यासाठी वरदान मानले जातात. अक्रोड खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. खासकरून मेंदुच्या आरोग्यासाठी अक्रोड खूप फायदेशीर मानले जातात. रोज मुठभर अक्रोड खाल्ले तर शरीरात अनेक सकारात्मक बदल बघायला मिळतात. असं केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. अशात एक महिना रोज थोडे अक्रोड खाल्ल्याने काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.
भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे
१) मेंदुसाठी फायदेशीर
अक्रोडमधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स मेंदुच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. अक्रोड खाल्ल्यानं स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रीत होतं आणि मानसिक थकवाही कमी होतो.
२) हृदय निरोगी राहतं
अक्रोडमध्ये आढळणारं अल्फा-लिनोळेनिक अॅसिड आणि मॅग्नेशिअम हृदयाच्या मांसपेशी मजबूत करतं. तसेच याने कोलेस्टेरॉल कंट्रोल होऊन हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.
३) पचन तंत्र मजबूत राहतं
भिजवलेल्या अक्रोडमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं, ज्यमुळे पचन तंत्र मजबूत ठेवण्यास मदत मिळते. अक्रोड रोज खाल्ल्यानं बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधी इतरही समस्या दूर होऊ शकतात.
४) त्वचेसाठी फायदेशीर
अक्रोडमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ई आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सने त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. याने त्वचा हेल्दी आणि तरूण दिसते.
५) वजन कमी होतं
अक्रोड खाल्ल्याने पोट जास्त भरलेलं राहतं, ज्यामुळे अनावश्यक खाणं टाळलं जातं. तसेच याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. अशात वजन कमी करण्यास मदत मिळते.
६) केस मजबूत होतील आणि वाढही होईल
अक्रोडमधील बायोटिन आणि व्हिटॅमिन बी ने केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच केसांची वाढही होते. नियमितपण अक्रोड खाल्ल्यास केस दाट आणि मजबूत होतील.
कसे खाल अक्रोड?
रोज रात्री ४ ते ५ अक्रोड पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उपाशीपोटी ते खा. अक्रोड तुम्ही स्मूदी, सलाद आणि ओट्समध्ये टाकूनही खाऊ शकता.