Lokmat Sakhi >Food > भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरीच का खावी? ६ फायदे- राहाल एकदम तंदुरुस्त 

भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरीच का खावी? ६ फायदे- राहाल एकदम तंदुरुस्त 

Makar Sankranti Special: भोगीच्या दिवशी गव्हाच्या पीठाची पोळी, ज्वारीची भाकरी असं टाळून बाजरीची भाकरीच करण्यात येते. असं का?(benefits of eating bajara roti or bajarichi bhakari in winter)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2025 18:14 IST2025-01-09T18:13:23+5:302025-01-09T18:14:22+5:30

Makar Sankranti Special: भोगीच्या दिवशी गव्हाच्या पीठाची पोळी, ज्वारीची भाकरी असं टाळून बाजरीची भाकरीच करण्यात येते. असं का?(benefits of eating bajara roti or bajarichi bhakari in winter)

benefits of eating bajara roti or bajarichi bhakari in winter, amazing health benefits of eating bajra, benefits of eating bajara bhakari with til in winter | भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरीच का खावी? ६ फायदे- राहाल एकदम तंदुरुस्त 

भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरीच का खावी? ६ फायदे- राहाल एकदम तंदुरुस्त 

Highlightsबाजरी गरम असल्याने थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार ठेवून भरपूर उर्जा देते. भाकरीवर जे तीळ लावले जातात त्यामधून कॅल्शियम आणि नैसर्गिक तेल मिळते.

आपल्या सणवारांमधून आपल्या परंपरा जशा दिसून येतात तशीच आपली खाद्यसंस्कृतीही दिसून येते. आता हेच पाहा ना एरवी बाकीच्या सणांना पुरणपोळीचा मान असतो. पण संक्रांतीच्या दिवशी मात्र तिळगुळाची पोळी खाल्ली जाते आणि संक्रांतीच्या  आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते. वातावरणात होणारा बदल आणि  त्यानुसार आपल्या शरीराला असणाऱ्या पौष्टिक पदार्थांची गरज यानुसार ही खाद्यसंस्कृती विकसित झाली असावी, असं म्हटलं जातं. आता भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी केली जाते याचा अर्थ असा नाही की फक्त त्याच दिवशी बाजरीची भाकरी खावी (Makar Sankranti Special). त्याचा  खरा अर्थ असा आहे की सध्याच्या थंड ऋतूमध्ये आपण बाजरी जास्तीतजास्त प्रमाणात खायला हवी. म्हणूनच आता बघुया की हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे एवढे महत्त्व का?(benefits of eating bajara bhakari with til in winter)


हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे महत्त्व

१. बाजरी गरम असल्याने थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार ठेवून भरपूर उर्जा देते. भाकरीवर जे तीळ लावले जातात त्यामधून कॅल्शियम आणि नैसर्गिक तेल मिळते. हिवाळ्यात हाडांचं दुखणं वाढतं. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी बाजरीचा उबदारपणा तसेच तिळामधले कॅल्शियम आणि नॅचरल ऑईल अतिशय उपयुक्त ठरते.

उरलेला भात वापरा, घरभर दिसणारी झुरळं होतील गायब! पाहा एक भन्नाट आणि सोपा उपाय

२. बाजरीमधून भरपूर मॅग्नेशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन्स, कॅलरी, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात मिळते. 

३. बाजरी हे लो कॅलरी डाएट असल्याने वेटलॉस करणाऱ्या लोकांसाठीही ती उपयुक्त ठरते.


 

४. हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होऊन केस गळण्याचे प्रमाण बरेच वाढलेले असते. ते कमी करण्यासाठीही बाजरी खाणे उपयुक्त ठरते. कारण बाजरीमधील बायोटीन आणि रायबोफ्लाविन हे घटक केसांची मुळं पक्की करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

संक्रांत स्पेशल: बेसन वापरून घरच्याघरी करा फेशियल, चेहरा उजळून जाईल- त्वचेवर येईल तेज

५. बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठीही बाजरीची मदत होते. सद्ध्या मधुमेह ही समस्या अतिशय वाढलेली असल्याने बाजरी खाणे फायदेशीर ठरते.

६. हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते.   


 

 

Web Title: benefits of eating bajara roti or bajarichi bhakari in winter, amazing health benefits of eating bajra, benefits of eating bajara bhakari with til in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.