Lemon Benefits : लिंबाचा वापर घरात रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. जास्तीत जास्त लोक भाजीवर लिंबू पिळतात. आंबट आणि टेस्टी असं लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. वजन कमी करणं असो, त्वचा निरोगी ठेवणं असो, एनर्जी मिळवणं असो या सगळ्या गोष्टींसाठी लिंबाची मदत घेतली जाते. अशात जर तुम्ही रोज एक लिंबू खाल्लं तर शरीराला काय काय फायदे मिळतील, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही हे फायदे वाचले तर रोज एक लिंबू नक्की खाल.
स्ट्रोकपासून बचाव
२०१२ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, आंबट फळांमध्ये फ्लेवोनोइड नावाचं तत्व असतं. जे महिलांमध्ये इस्केमिक स्ट्रोकचा धोका कमी करतं. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या १४ वर्षात ७० हजार महिलांच्या डेटावरून समोर आलं की, जे सगळ्यात जास्त आंबट फळं खातात, त्यांना इस्केमिक स्ट्रोकचा धोका १९ टक्के कमी होता.
हाय ब्लड प्रेशर
एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, ज्या महिला नियमितपणे पायी चालतात आणि रोजच्या आहारात लिंबाचा समावेश करतात, त्यांचं ब्लड प्रेशर त्या महिलांच्या तुलनेत कमी असतं, ज्या चालत नाही किंवा लिंबाचा वापर करत नाहीत.
कॅन्सरपासून बचाव
लिंबाच्या रसामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. अॅंटी-ऑक्सिडेंट पेशींचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. फ्री रॅडिकल्समुळे पेशी डॅमेज झाल्या तर कॅन्सरचा धोका होऊ शकतो.
त्वचेचा रंग कायम राहतो
व्हिटॅमिन सी मुळं कोलेजनचं उत्पादन अधिक होतं. ज्यामुळे त्वचा हेल्दी राहते. व्हिटॅमिन सी त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतं. यानं त्वचेची रंगत कायम राहते.
इम्यूनिटी मजबूत होते
लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंटमुळं शरीराची इम्यूनिटी मजबूत होते. त्यामुळे वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. लिंबाच्या रसामुळं शरीराला एनर्जी मिळते.