Join us  

'या' पद्धतीने करा पारंपरिक पंचामृत, केस सुंदर-त्वचेवर तेज- बघा आरोग्याचे ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2024 12:06 PM

Benefits Of Eating Panchamrit Daily As Per Ayurveda: पंचामृत करताना कोणता पदार्थ किती प्रमाणात घ्यावा, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती एकदा बघाच...(how to make panchamrut)

ठळक मुद्देपित्त, वात आणि कफ हे तीन दोष संतुलित ठेवण्यासाठीही पंचामृत खाणे फायद्याचे ठरते.

श्रावण सुरू झाला आणि त्यासोबतच सणावाराचे दिवस सुरू झाले. आता घरी एखादा धार्मिक कार्यक्रम असला की पंचामृत करणे ओघाने आलेच. दूध, दही, मध, खडीसाखर आणि तूप हे पाच पदार्थ एकत्र करून पंचामृत करतात हे आपल्याला माहिती आहे. पण हेच पंचामृत आरोग्यासाठी अधिक फायदेशीर व्हावे, यासाठी कोणता पदार्थ किती प्रमाणात घ्यावा हे एकदा बघून घ्या (how to make panchamrit?). पूजेसाठी तयार केलेलं पंचामृत पुजेनंतर आवर्जून खा (proper method of making panchamrit). कारण त्यामुळे आरोग्याला तर फायदा होतोच, पण केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढायलाही मदत होते.(benefits of eating panchamrit daily as per Ayurveda)

 

पंचामृत करण्याची योग्य पद्धत  

पंचामृत तयार करण्याची योग्य पद्धत कोणती, तसेच पंचामृत तयार करताना कोणता पदार्थ किती प्रमाणात घ्यावा, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेली माहिती dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेली आहे.

स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

यामध्ये डॉ. मनिषा असं सांगतात की पंचामृत हे फक्त पुजेच्या दिवशीच नाही तर दररोज सकाळी एक ते दोन चमचे नियमितपणे खायला पाहिजे. पंचामृत तयार करताना अर्धा कप उकळून थंड झालेले दूध घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून दही टाका, ५ मिली तूप, अर्धा चमचा खडीसाखर आणि १ टेबलस्पून मध टाका. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि अशा पद्धतीने तयार झालेलं पंचामृत दररोज सकाळी नियमितपणे खा.

 

दररोज पंचामृत खाण्याचे फायदे 

1. पंचामृत नियमितपणे खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 

2. त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी पंचामृत उपयुक्त ठरते. 

'या' ३ कारणांमुळे कमी वयात केस पांढरे होतात; बघा त्यासाठी नेमके काय उपाय करावे 

3. पंचामृतामध्ये असणारे घटक केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. 

4. पंचामृत नियमितपणे खाल्ल्याने शरीरातील पेशी दुरुस्त होण्याचे काम अधिक वेगवान होते. 

5. पित्त, वात आणि कफ हे तीन दोष संतुलित ठेवण्यासाठीही पंचामृत खाणे फायद्याचे ठरते.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्यत्वचेची काळजीकेसांची काळजीघरगुती उपाय