Lokmat Sakhi >Food > मुळ्यापेक्षाही जास्त गुणकारी आहे मुळ्याचा पाला! चुकूनही फेकू नका- 'या' पद्धतीने खा- होतील ५ फायदे 

मुळ्यापेक्षाही जास्त गुणकारी आहे मुळ्याचा पाला! चुकूनही फेकू नका- 'या' पद्धतीने खा- होतील ५ फायदे 

Benefits Of Eating Radish Leaves: बरेच लोक मुळा खातात आणि मुळ्याचा पाला मात्र टाकून देतात. तुम्हीही असंच करत असाल तर हे एकदा वाचाच...(how to make radish leaves sabji?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2024 04:45 PM2024-12-03T16:45:13+5:302024-12-03T16:46:35+5:30

Benefits Of Eating Radish Leaves: बरेच लोक मुळा खातात आणि मुळ्याचा पाला मात्र टाकून देतात. तुम्हीही असंच करत असाल तर हे एकदा वाचाच...(how to make radish leaves sabji?)

benefits of eating radish leaves, how to make radish leaves sabji, muli ke patte ki sabji  | मुळ्यापेक्षाही जास्त गुणकारी आहे मुळ्याचा पाला! चुकूनही फेकू नका- 'या' पद्धतीने खा- होतील ५ फायदे 

मुळ्यापेक्षाही जास्त गुणकारी आहे मुळ्याचा पाला! चुकूनही फेकू नका- 'या' पद्धतीने खा- होतील ५ फायदे 

Highlightsमुळ्याएवढाच मुळ्याचा पालाही पौष्टिक असतो. मुळ्याच्या पानांचे आरोग्याला कसे फायदे होतात ते पाहूया..

हिवाळ्यामध्ये बाजारात मुळा भरपूर प्रमाणात मिळतो. बाजारातले काही हौशी भाजी विक्रेते अतिशय आकर्षक पद्धतीने पांढराशुभ्र मुळा एकावर एक रचून ठेवतात. ती सुरेख मांडणी पाहिली की लगेचच मुळा घेऊन खावासा वाटतो. बरेच जण मुळा तोंडी लावायला घेतात. काही त्याचं लोणचंं घालतात तर काही मुळ्याचं रायतं, कोशिंबीर, पराठे असे वेगवेगळे पदार्थ करतात. बहुतांश लोक मुळा तर खातात पण त्यासोबत येणारा हिरवा पाला मात्र टाकून देतात. पण खरं पाहिलं तर त्या मुळ्याएवढाच मुळ्याचा पालाही पौष्टिक असतो (muli ke patte ki sabji). मुळ्याचा पाला खाण्याची योग्य पद्धत कोणती (how to make radish leaves sabji?) आणि मुळ्याच्या पानांचे आरोग्याला कसे फायदे होतात ते पाहूया..(benefits of eating radish leaves)

 

मुळ्याचा पाला कसा खावा?

मुळ्याचा पाला खाण्याची योग्य पद्धत कोणती याविषयीची माहिती डॉक्टरांनी askhealthguru and dr_varun_ayurveda या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

त्यानुसार मुळ्याचा पाला कधीही कच्चा खाऊ नका. मुळ्याचा पाला स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तो बारीक चिरून घ्या.

अभिषेक बच्चन म्हणतो, बायको सांगेल तेच करा, बायकोचं ऐका! का म्हणाला अभिषेक असं..

गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तेल, मोहरी, हिंग, जिरे आणि लसूण टाकून फोडणी करून घ्या. 

त्यानंतर कांदा परतून घ्या आणि मग मुळ्याचा पाला टाकून तो सुद्धा परतून घ्या. चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. नंतर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या. यामध्ये तुम्ही हरबऱ्याची किंवा मुगाची भिजवलेली डाळसुद्धा घालू शकता. 

 

मुळ्याचा पाला खाण्याचे फायदे

१. मुळ्याचा पाला खाल्ल्याने कफ, पित्त, वात असे तिन्ही दोष कमी होतात.

२. किडनीस्टोन किंवा मुत्रविकाराचा त्रास कमी होण्यासाठी मुळ्याचा पाला खाणे फायदेशीर ठरते.

हिवाळ्यात काेरड्या पडलेल्या त्वचेला द्या 'हे' सुपरटॉनिक! ५ पदार्थ खा- ड्राय त्वचा होईल मुलायम

३. अपचनाचा किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर मुळ्याचा पाला नियमितपणे खाल्ल्यास नक्कीच फायदा होईल.

४. मुळ्याच्या पाल्यातून व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नशियम भरपूर प्रमाणात मिळते. 

५. मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठीही मुळ्याचा पाला खाणे फायदेशीर ठरते. 


 

Web Title: benefits of eating radish leaves, how to make radish leaves sabji, muli ke patte ki sabji 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.