Join us  

पावसात रानभाज्या खाण्याचे ५ फायदे- पौष्टिक पावसाळी भाज्या नाही खाल्ल्या तर काय मजा! व्हा आरोग्यसंपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2024 9:06 AM

Healthy Food Tips: पावसाळ्यात सगळीकडेच मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या रानभाज्या ही या दिवसांतली खरी श्रीमंती आहे... (benefits of eating ranbhajya in marathi)

ठळक मुद्देभरपूर पोषण देणाऱ्या रानभाज्या आरोग्याचा ठेवा म्हणून ओळखल्या जातात. 

पावसाळा सुरू झाला की रानभाज्या यायला सुरुवात होते. एरवी बाकीच्या भाज्या आपण वर्षभर खातोच. पण रानभाज्यांचे वैशिष्ट्य असे की त्या फक्त पावसाळ्याचे २ ते ३ महिनेच मिळतात. आपल्या इतर भाज्यांप्रमाणेच या भाज्या खूप गुणकारी असतात. त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स, फायबर असतात. त्यामुळे या भाज्यांमधील पोषक गुणांचा लाभ शरीराला मिळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांत या काही रानभाज्या आवर्जून खायलाच पाहिजेत, असं आहारतज्ज्ञ सांगतात. (benefits of eating ranbhajya in marathi)

 

रानभाज्या शिजवताना काय काळजी घ्यावी?

आपण बऱ्याचदा भाज्या खूप जास्त शिजवतो, उकडतो. त्यामुळे त्याची चव जरी चांगली होत असली तरी त्या भाज्यांमधील पोषणतत्त्वे मात्र बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

संशोधक सांगतात 'या' कारणामुळेच खूप अभ्यास करूनही मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत...

त्यामुळेच रानभाज्यांच्या मूळ चवीला धक्का न लागू देता आणि त्यांच्यातील पोषण मुल्ये कमी न करता रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत. रानभाज्या बनविताना पुदिना, कैरी, लिंबू टाकून त्यांची पोषणमुल्ये वाढविता येतात. भाज्यांसोबत पाेळ्यांऐवजी भाकरी खाणे अधिक आरोग्यदायी असते, असं आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक सांगतात.

 

रानभाज्या खाण्याचे फायदे

१. शेवगा ही रानभाजी बहुतेक सगळ्याच प्रांतात आढळून येते. मधुमेह, हृदय, संधीवात, बद्धकोष्ठता असा त्रास कमी करण्यासाठी शेवगा उपयुक्त ठरतो.

२. अंबाडीच्या भाजीतून व्हिटॅमिन ए, लोह, झिंक, भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

ऋषी सुनक यांचा राजीनामा, चर्चा मात्र अक्षता मुर्तींच्या ४२ हजार रुपयांच्या सुंदर ड्रेसची

३. करटोली या रानभाजीतून प्रोटीन्स, लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स, फायबर मोठ्या प्रमाणावर मिळतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे.

४. अळूच्या भाजीतून व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम मिळते. ही भाजी हृदयरोगाचा, कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.

५. भरपूर पोषण देणाऱ्या रानभाज्या आरोग्याचा ठेवा म्हणून ओळखल्या जातात.  

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भाज्या