मंजिरी कुलकर्णी, आहारतज्ज्ञ
महाशिवरात्र, हरितालिका, श्रावणी सोमवार किंवा नवरात्री असे उपवासाचे (fast) दिवस असले की मग भाजीवाल्यांकडे रताळी हमखास विकायला येतात. एरवी मात्र ती चटकन दिसतही नाहीत आणि दिसलीच तरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. रताळी हा केवळ उपवासाला खाण्याचा पदार्थ, असं आपण स्वत:शी पक्क ठरवून टाकलं आहे. पण उपवास असो किंवा नसो वर्षभर नियमितपणे प्रत्येक स्त्री ने आपल्या आहारात रताळ्याचा (Benefits of eating ratali or sweet potato) समावेश करावा .गोडसर असणारे हे कंदमुळ morning glory ह्या शाखेमध्ये येते . रताळी ही मुळची अमेरिकेतली असून ते व्हिटॅमिन्स, खनिजे, फायबर यांचे पॉवरहाऊस म्हणुन ओळखले जाते.
रताळी खाण्याचे फायदे
१. रताळ्यामध्ये असणारी पोषक द्रव्ये आजारापासून लांब ठेवतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात.
नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन
२. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. जे डोळे आणि त्वचेसाठी उत्तम असते.
३. जी लहान मुले नुकतीच अन्न खायला लागलेली असतात, त्यांनाही आठवड्यातुन दोनदा उकडलेले रताळे द्यावे.
४. योग्य पद्धतीने उकडून खाल्लेल्या रताळ्यामुळे शुगर नियंत्रित राहते .
५. रताळ्यांमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पचनशक्ती चांगली राहते.
६. रताळ्यांमध्ये असणाऱ्या ॲण्टीऑक्सिडंट्समुळे फुप्फुस आणि प्रोस्टेट ग्लॅण्डच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
रताळी खाण्याची योग्य पद्धत
१. रताळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. पण ती जर आपण ३० मिनिटे उकडली तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. त्यामुळे मधुमेहींनी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ उकडलेली रताळी खावी.
नवरात्र स्पेशल हिरवी चटकदार चटणी, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात झटपट खास रेसिपी
२. रताळ्यासोबत साखरेऐवजी गुळाचा वापर करावा.
3. मधुमेह असणार्या व्यक्तींनी मिठाचा वापर करावा
4. बेक केलेले रताळे पण चवीला छान लागते.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.)