इतर कोणत्याही सरबतापेक्षा किंवा महागड्या कोल्ड्रिंकपेक्षा उन्हाळ्यात सर्वाधिक भाव खाऊन जातं ते कैरीचं पन्हं... कैरी, आंबा यांचं आकर्षण जेवढं असतं, तेवढंच आकर्षण त्यांच्यापासून बनविलेल्या पदार्थांचं असतं. म्हणूनच तर उन्हाळा सुरू होताच घरोघरी कैरीचं पन्हं, कैरीचं आंबटगोड लोणचं, तक्कू असं विविध पदार्थ बनवणं सुरू होऊन जातं.. त्यामुळेच तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं कैरीचं पन्हं पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं, याची ही खास रेसिपी. ही रेसिपी यु ट्यूबच्या madhurasrecipe या पेजला शेअर करण्यात आली आहे. (How To Make Kairi Panha, recipe in Marathi)
कैरीचं पन्हं करण्यासाठी लागणारं साहित्य कैरी, गूळ किंवा साखर, वेलची पावडर, पाणी आणि चवीनुसार मीठ.पन्हं करण्याची रेसिपी- कुकरमध्ये कैरी उकडून घ्या. त्यानंतर सालं काढून कैरीचा गर काढून घ्या.- गूळ किंवा साखर यापैकी काहीही घालून तुम्ही पन्हं करू शकता. हेल्थ कॉन्शस असाल तर गूळ वापरा. - आता कैरीचा गर आणि गूळ किंवा साखर यापैकी जे घालणार असाल ते एका बाऊलमध्ये चांगलं एकजीव करून घ्या.- त्यात थोडीशी वेलचीपूड टाका.
- त्यानंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या.- आता हा कैरीच्या पन्ह्यासाठी लागणारा पल्प तयार झाला. हा पल्प तुम्ही हवाबंद बरणीत भरून फ्रिजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवू शकता.- आता एक ग्ला थंड पाणी घ्या. त्यात दोन टेबलस्पून कैरीचा पल्प घाला. चिमुटभर मीठ टाका. आवडत असल्यास बर्फ टाकून मिश्रण चांगलं हलवून घ्या. कैरीचं थंडगार आंबटगोड पन्हं झालं तयार..
कैरीचं पन्हं पिण्याचे फायदे (Benefits of drinking kairi panha)१. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.२. कैरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी पन्हे उपयोगाचे ठरते.३. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दररोज एखादा ग्लास पन्हे आवर्जून प्यावे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.४. कैरीमध्ये व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांसाठी पोषक ठरते.५. कैरीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे पन्हे उर्जादायी ठरते. त्यामुळे पन्हे प्यायल्यानंतर बराच वेळ काही खाल्ले नाही, तरी चालते.