Join us  

साय आवडत नाही, फेकून देता? साय खाण्याचे ५ फायदे- त्वचा चमकदार-हाडं मजबूत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 6:43 PM

Malai Health Benefits Never Throw Milk Cream In Dustbin : अनेकांना साय आवडत नाही, वजन वाढेल म्हणूनही साय खाणं टाळलं जातं, पण साय न खाणं तब्येतीसाठी बरं नाही.

दुधाला आपल्या भारतीय आहारातील सर्वात महत्वाचा पदार्थ मानला जातो. रोजच्या आहारात आपण दुधाचा वापर करतो. दुधामध्ये आवश्यक ती पोषक तत्वे असल्यामुळे दुधाला पूर्णान्न म्हणून देखील संबोधले जाते. दूध हा एकमेव असा पदार्थ आहे की ज्यामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी असतात.  दूध तर आपल्या आरोग्यासाठी महत्वाचे असतेच परंतु दुधाचे तयार केले जाणारे पदार्थ जसे की, दही, तूप, लोणी, पनीर असे पदार्थ देखील शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. आणि मुख्य म्हणजे साय, ती फार कामाची आहे.

दुधाची साय यालाच बरेच जण मलई असंही म्हणतात. खूप लोकांना साय आवडते तर काहींना नाही. कुणी वजन वाढेल म्हणून खात नाही. काचहा कपामध्ये ओतताना दुधासोबत जर साय आली, तर ती लगबगीने मागे केली जाते, कारण दुधामधून निघणाऱ्या या सायीमध्ये फॅट्सचे प्रमाण अधिक असते असे समजून साय खाणे टाळले जाते. काहीजण तर चक्क या सायीला फॅट समजून फेकून देतात. परंतु साय फेकून न देता ती खाल्ल्याने त्याचे चांगले फायदे आपल्या शरीराला मिळतात(Benefits Of Malai: 5 Reasons Why Fresh Milk Cream Should Be There In Your Diet).

सायीचे फायदे :- 

१. सायीमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे संपूर्ण आरोग्याला फायदे देतात. त्यात जीवनसत्त्वे ए, डी आणि ई सारखी जीवनसत्त्वे असतात, जी निरोगी दृष्टी देतात, हाडे मजबूत करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांचा साय देखील एक उत्तम स्रोत आहे, जे शरीराला निरोगी आणि सक्रिय ठेवण्यास मदत करते.

२.  चेहऱ्यावर लावण्यासोबतच साय खाल्ल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. सायीमध्ये असलेली पोषक तत्वे आणि प्रथिने त्वचेचे पोषण करतात आणि ती मऊ आणि चमकदार बनवतात. त्यामुळेच त्वचेच्या सौंदर्यासाठी  घट्ट साय अतिशय महत्वाची असते. 

फक्त ३ पदार्थ वापरुन आता कॅफे स्टाईल नाचोस बनवा घरीच! क्रिस्पी कुरकुरीत नाचोसची सोपी कृती...

३. साय खाल्ल्याने वजन वाढते असा गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु हे साफ चुकीचे आहे. दुधाच्या सायीमध्ये फॅट्सचे प्रमाण असते. परंतु हे चांगले फॅट्स असतात. साय खावी परंतु ती प्रमाणात खावी. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. 

४. सायीत कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. हाडांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.साय नियमितपणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडांची घनता सुधारते. 

उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...

५. मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी चांगल्या फॅट्सची आवश्यकता असते आणि साय अशा फॅट्सचा नैसर्गिक स्रोत आहे. जे मेंदूच्या पेशींची रचना आणि कार्य करण्यास प्रोत्साहन देते.

टॅग्स :अन्न