Join us  

भरपूर कॅल्शियम हवं तर आहारात हवंच नाचणीचं आंबील, १० मिनीटांत होणारी पौष्टीक-चविष्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 12:13 PM

Benefits of Nachni Nagli and Easy healthy Aambil Recipe : नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.

आपल्या रोजच्या जेवणात भात, पोळी, भाजी, आमटी, कोशिंबीर यांचा समावेश असतो. आपल्याकडे गहू, तांदूळ, ज्वारी यांचा आहारात जास्त प्रमाणात वापर होतो. मात्र तृणधान्यांचा आपण उपयोग करतोच असे नाही. पण तृणधान्ये हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांचाही आहारात समावेश करायला हवा. बाजरी, राजगिरा, बार्ली, नाचणी ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी तृणधान्ये असून ती शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात. नाचणी हे भारतात पिकणारे आणि सहज उपलब्ध होणारे तृणधान्य असून ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. नाचणीचे शरीराला नेमके काय फायदे होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तांदूळ आणि गहू आणि ज्वारी पेक्षा किती तरी पटीने जास्त पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात. नाचणीचे आंबील ही करायला अतिशय सोपी, चविष्ट आणि तितकीच पौष्टीक अशी रेसिपी कशी करायची ते पाहूया आणि नाचणीचे फायदे समजून घेऊया (Benefits of Nachni Nagli and Easy healthy Aambil Recipe)... 

कसं करायचं आंबील ?

१. एका बाऊलमध्ये २ चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये साधारण २ वाट्या पाणी घालायचे. 

२. यामध्ये चवीनुसार मीठ, आलं-लसूण पेस्ट, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

३. काही वेळासाठी हे पीठ तसेच भिजत ठेवायचे म्हणजे ते चांगले फुगण्यास मदत होते.

४. गॅसवर एक पॅन किंवा पातेले ठेवून त्यामध्ये २ ग्लास पाणी घालून त्यात थोडे मीठ घालून पाणी चांगले उकळायचे.

५. पाणी उकळत असतानाच यात बाऊलमध्ये तयार केलेले नाचणीचे पीठ हळूहळू घालायचे. 

६. आता हे मिश्रण गॅसवर चांगले उकळू द्यावे आणि चांगले शिजले की गॅस बंद करावा. 

७. दुसरीकडे एका पातेल्यात घट्ट दही घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, साखर मिरची आणि कोथिंबीर घालून त्याचा मठ्ठा तयार करायचा.

८. ग्लासमध्ये खाली शिजवलेले नाचणीचे पीठ घालून त्यात वरुन हा मठ्ठा घालायचा आणि हे आंबिल नाश्ता किंवा मधल्या वेळेला घ्यायचे.  

नाचणीचे फायदे 

१. शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात.

२. गर्भवती महिलांसाठीही नाचणी अतिशय पौष्टीक समजली जाते. त्यामुळे अर्भकाची वाढ चांगली होण्यास मदत होते. 

३. लहान मुलांसाठीही नाचणी खाणे अत्यंत लाभदायक असते. वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होण्यास मदत होते. 

४. नाचणी खाल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते म्हणून ज्याला रक्ताची कमतरता आहे अशांनी रोज नाचणी

५. पोटात गॅस धरणे, पोटदुखी, अपचन या तक्रारींवर नाचणी गुणकारी असते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य