वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक डाळी खाणे हा आपल्या रोजच्या आहाराचा एक महत्वपूर्ण भाग आहे. भारतीय जेवणाची थाळी म्हटली की त्यात डाळ, भात, चपाती, भाजी, कोशिंबीर असे अनेक पदार्थ असतात. या सगळ्या पदार्थांशिवाय भारतीय थाळी पूर्णच होऊ शकत नाही. आपण ताटातल्या डाळीसोबत चपाती किंवा भात दोन्ही खाऊ शकतो. डाळीला भारतीय संपूर्ण आहारातील प्राण म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. जवळपास दररोज प्रत्येक घरात कुठली ना कुठली डाळ तयार केली जाते. डाळ चवीला जितकी स्वादिष्ट आहे तितकीच ती आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, कारण डाळीमधून शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण केली जाते.
कोणत्याही प्रकारची डाळ करायची म्हटलं की, आपण ती डाळ आधी स्वच्छ धुवून मग काही तासांसाठी पाण्यांत भिजत ठेवतो. पाण्यांत डाळ व्यवस्थित भिजवल्यानंतर, आपण डाळ शिजवून तिला खमंग फोडणी देऊन तयार करतो. असे असले तरीही स्वयंपाक करण्यापूर्वी डाळी पाण्यांत भिजत ठेवणे आवश्यक आहे का ? तसेच या डाळी पाण्यांत भिजत ठेवल्याने त्याचा नेमका आपल्याला काय फायदा होतो. अशा सर्व महत्वाच्या गोष्टींची माहिती सुप्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून एक व्हिडीओ शेअर करून दिली आहे(Benefits of soaking pulses or lentils in water before cooking).
स्वयंपाक करण्यापूर्वी डाळ पाण्यांत भिजत घालणे महत्वाचे आहे... स्वयंपाक बनवण्यापूर्वी डाळ व्यवस्थित भिजली आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे असते. जास्तीत जास्त घरांमध्ये मूग डाळीचा वापर केला जातो, कारण ती फक्त शिजवण्यासच सोपी नसून इतर सर्व डाळींच्या तुलनेत पचायला सुद्धा खूप हलकी असते. रोजच्या आहारात डाळी खायला आवडते आणि डाळीच्या वापराशिवाय एक दिवसही जेवण जात नाही, अशा व्यक्तींपैकी जर आपण एक असाल तर आपल्यासाठी एक खास टीप आहे, ती म्हणजे डाळीला कुकरमध्ये घालून शिट्टी देण्यापूर्वी दररोज डाळी न विसरता काही काळासाठी भिजत घालाव्यात.
कोथिंबीर-पुदिन्याची जुडी निवडली पण दोन दिवसात सडली तर ? ३ उपाय, पुदिना - कोथिंबीर राहील हिरवीगार...
डायजेशन करणे होते सोपे...
सुप्रसिद्ध मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'पाण्यात व्यवस्थित भिजवून नंतर डाळी शिजवल्याने आपल्या आरोग्याला त्याचे चांगले परिणाम मिळतात. अशाप्रकारे डाळी खाल्ल्याने आपले पचन चांगले होते आणि पौष्टिक तत्वांचे शोषण करणे शरीराला सोपे होते. हेच मुख्य कारण आहे की, स्वयंपाक करण्यापूर्वी डाळी भिजत घालणे महत्वाचे असते. जर आपल्याला डाळीमध्ये असलेल्या सर्व पोषक घटकांचा पुरेपूर लाभ घ्यायचा असेल तर त्या भिजवून नंतर शिजवाव्यात.
गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!
सकाळचा पहिला चहा बिघडला-पांचट झाला तर मूड जातोच, ४ टिप्स- चहा होईल फक्कड...
डाळीतील इतर अनावश्यक घटक बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते...
डाळी पाण्यांत भिजवल्याने डाळींमध्ये ताजेपणा येतो. याव्यतिरिक्त ही टीप वापरुन पोषकतत्व शोषण्यास अडथळा आणणा-या आणि पोट फुगण्यास जबाबदार ठरणारे फायटिक अॅसिड आणि टॅनिन देखील डाळींमधून काढून टाकता येते. हेच कारण आहे की बहुतांश लोकांना राजमा सारखे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटते आणि गॅस्ट्रिक पेन सारखी समस्याही होते. विशेष गोष्ट म्हणजे डाळी भिजवल्यानंतर आपल्या स्वयंपाकाचा वेळही वाचवता येऊ शकतो, कारण भिजवलेल्या डाळी लवकर शिजतात. डाळ शिजवण्याचा हा एक उत्तम व योग्य मार्ग आहे. पंकज भदौरिया यांच्या मते, डाळी चुकीच्या पद्धतीने खाण्यापेक्षा योग्य प्रकारे शिजवून मग त्याचा आनंद घेणे अधिक फायदेशीर ठरते.
तीळगुळाचे लाडू खाल्लेच असतील, आता खाऊन पाहा तीळगुळाच्या दशम्या-पावसाळ्यातला पौष्टिक आहार...
डाळी भिजवून ठेवण्याची योग्य वेळ...
१. अख्ख्या डाळी जसे की मूग, तूर, मसूर आणि उडीद डाळ बनवण्याआधी ८ ते १२ तास भिजवून ठेवाव्यात. २. याउलट अर्ध्या डाळी ६ ते ८ तास भिजवून ठेवाव्यात. ३. राजमा, छोले आणि चणे यासारख्या हेव्ही व पचायला जड डाळी किंवा कडधान्य १२ ते १८ तास भिजवून ठेवाव्यात. ४. कोणतीही डाळ रात्रभर भिजवून ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. ५. शक्यतो डाळीच्या जेवणाचा आनंद हा दुपारच्या जेवणातच घ्यावा. शक्यतो रात्रीच्या जेवणात डाळ खाणे टाळावे.