Lokmat Sakhi >Food > फक्त ४ पदार्थ आणि चवदार बंगाली गरम मसाला तयार, शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

फक्त ४ पदार्थ आणि चवदार बंगाली गरम मसाला तयार, शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

Bengali garam masala  Recipe: कधी कधी वेगळ्या चवीच्या भाज्या खाव्या वाटतात. अशा वेळी हा बंगाली मसाला टाकून भाज्या करून बघा.. चवीतला बदल नक्कीच सगळ्यांना आवडेल. (how to make Bengali garam masala)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 03:26 PM2022-08-23T15:26:28+5:302022-08-23T15:27:24+5:30

Bengali garam masala  Recipe: कधी कधी वेगळ्या चवीच्या भाज्या खाव्या वाटतात. अशा वेळी हा बंगाली मसाला टाकून भाज्या करून बघा.. चवीतला बदल नक्कीच सगळ्यांना आवडेल. (how to make Bengali garam masala)

Bengali garam masala just in 10 minutes, Special recipe by celebrity chef Kunal Kapoor | फक्त ४ पदार्थ आणि चवदार बंगाली गरम मसाला तयार, शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

फक्त ४ पदार्थ आणि चवदार बंगाली गरम मसाला तयार, शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

Highlightsआपल्या पारंपरिक पद्धतीने केलेल्या भाज्यांच्या चवीमध्ये थोडा वेगळेपणा आणायचा असेल तर मसालेदार भाज्यांमध्ये हा मसाला टाकून बघा.

भारतात प्रत्येक प्रांतातली खाद्य संस्कृती वेगवेगळी आहे. त्यामुळेच तर चवीमध्ये बदल हवा असेल, तर आपल्याकडे अनेक प्रकारचे पदार्थ अगदी सहज उपलब्ध होऊ शकतात. आपलं रोजचं तेच ते खाऊन कंटाळा आला, की असा चवीमधला, पदार्थांमधला बदल हवाच असतो. म्हणूनच तर बंगाली पद्धतीने मसाला तयार करण्याची ही एक खास रेसिपी बघा. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (celebrity chef Kunal Kapoor) यांनी ही रेसिपी (Bengali garam masala Recipe) त्यांच्या इन्स्टाग्राम पेजला शेअर केली असून या मसाल्यालाच बंगाली लोक वाजा मसाला (Vaja Masala) असंही म्हणतात. 

 

या बंगाली मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा मसाला तयार करण्यासाठी तुम्हाला खूप काही कुटाणे करण्याची अजिबातच गरज नाही. शिवाय तो करण्यासाठी खूप सारे पदार्थ लागतात, असंही मुळीच नाही.

समोशासोबत झणझणीत तर्री आणि भात! बघा औरंगाबादची स्पेशल डिश- समोसा राइस, टेस्ट अशी भारी की..

फक्त ४ पदार्थ वापरून तुम्हाला हा मसाला तयार करता येतो आणि तो अवघ्या १० ते १५ मिनिटांत तयार होतो. म्हणूनच कधी कधी आपल्या पारंपरिक पद्धतीने केलेल्या भाज्यांच्या चवीमध्ये थोडा वेगळेपणा आणायचा असेल तर मसालेदार भाज्यांमध्ये हा मसाला टाकून बघा. तुम्ही बंगाली मसाला आणि आपला पाारंपरिक गरम मसाला अशा दोन्ही मसाल्यांचा वापर करूनही एका नव्याच चवीची भाजी करू शकता. 

 

बंगाली मसाला करण्याची रेसिपी
- साधारण एका वेळी एका भाजी घालण्यापुरता मसाला तयार करायचा असेल तर त्यासाठी ३ ते ४ हिरव्या वेलची, १ टेबलस्पून जीरे, १ टेबलस्पून धने आणि १ टेबलस्पून बडिशेप एवढं साहित्य घ्यावं. 

हिरव्या रंगाची कॉफी, वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त, बघा नेमका काय हा प्रकार- कशी करायची हिरवी कॉफी 
- आता कढई गॅसवर तापायला ठेवा. कढई तापली की त्यात आधी वेलची टाका. मंद आचेवर वेलची भाजून घ्या. त्यानंतर त्यात जीरे, धने आणि बडिशेप टाका आणि भाजून घ्या.
- हे सगळं साहित्य मंद आचेवर भाजावं, शिवाय १ ते दिड मिनिटांपेक्षा जास्त वेळ भाजू नये. अन्यथा मसाल्याचा स्वाद कमी होतो.
- त्यानंतर हे साहित्य एका ताटात काढून घ्या आणि थंड होऊ द्या.
- थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घेतलं की बंगाली स्टाईल मसाला झाला तयार. 

 

Web Title: Bengali garam masala just in 10 minutes, Special recipe by celebrity chef Kunal Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.