Join us  

कापसासारखी सॉफ्ट, स्पॉन्जी बेसन इडली घरीच करा; अगदी सोपी रेसिपी-५ मिनिटांत बनेल नाश्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 3:53 PM

Besan Idli Recipe (Besan Idli Kashi Karaychi) : जर तुम्ही नाश्त्याला पोहे, चपाती भाजी असे पदार्थ खाऊन कंटाळला असला तर नवीन रेसिपीज ट्राय करू शकता. हा नवीन पदार्थ तुम्ही झटपट घरीच बनवू शकता.

नाश्ता आणि स्नॅक्समध्ये खाण्यासाठी महिला वेगवेगळ्या पदार्थांच्या शोधात असतात जे करायलाही सोपे असतील आणि जास्त वेळही जाणार नाही. (Instant Dhokla Idli For Breakfast) कारण लहान मुलं असो किंवा घरातील मोठी माणसं नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळतात. जर तुम्ही नाश्त्याला पोहे, चपाती भाजी असे पदार्थ खाऊन कंटाळला असला तर नवीन रेसिपीज ट्राय करू शकता. हा नवीन पदार्थ तुम्ही झटपट घरीच बनवू शकता. (Besan Idli Recipe in Marathi)

इडली- डोसा हे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात.  (Cooking tips) इडली करण्यासाठी तांदूळ भिजवणं, दळणं अशी मोठी प्रोसेस असते. यातलं काहीही न करता घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही चवदार पदार्थ बनवू शकता. बेसन इडली करणं फारच सोपं आहे. बेसन इडली करण्याची सोपी रेसिपी पाहूया (How to Make Besan Idli)

बेसन इडली करण्यासाठी लागणारं साहित्य (Besan Idli Recipe)

१) १०० ग्राम बेसन

२) १ चमचा खाण्याचा सोडा

३) १ चमचा इनो

४) १ एक चमचा लाल मिरची पावडर

५)  १ चमचा मोहोरी

६) ३ बारीक चिरलेल्या मिरच्या

७) १ छोटा चमचा दही

८) गरजेनुसार पाणी

९) चवीनुसार मीठ

१०) १ वाटी रवा

बेसन इडली करण्याची कृती (Instant Idli Recipe)

१) बेसनाची इडली करण्यासाठी सगळ्यात आधी एक बाऊल घ्या. त्यात बेसन,  रवा, सोडा, मिरच्या, दही आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्या. पूर्ण साहित्य एकजीव केल्यांतर हळूहळू पाणी घालून मिश्रण एकजीव करा. 

२) इडलीचे जाडसर बॅटर तयार करून घ्या. हे बॅटर तयार झाल्यानंतर १५ मिनिटांसाठी झाकून ठेवून द्या. नंतर बॅटर इडलीच्या बॅटरला तेल लावून यात बेसनाचे मिश्रण घाला.

ताकाची कढी करण्याची सोपी-परफेक्ट रेसिपी; अजिबात फुटणार नाही-कमी साहित्यात बनेल कढी

३) इडलीचे बॅटर साच्यात घातल्यानंतर एका मोठ्या भांड्यात घाला. हे भांडं गरम करून त्यावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटांसाटी शिजवून घ्या. असं केल्यानं इडलीचे बॅटर सॉफ्ट बनेल आणि खायलाही चांगले लागेल. 

४) जवळपास १५ मिनिटं इडली वाफेवर शिजवा. सुगंध आल्यानंतर गॅस बंद करा. भांडं थंड झाल्यानंतर गॅस बंद करा. मग इडल्या एका ताटात काढून घ्या. 

५) इडली जास्त सॉफ्ट झालेल्या दिसून येतील. इडल्या ताटात काढण्यासाठी सुरीचा वापर करू शकता. बेसनाची इडली तयार आहे.

बिना साखरेचे पौष्टीक डिंकाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी; मिश्रण कोरडे न होता करा परफेक्ट लाडू

६) इडल्या तुम्ही नारळाची चटणी किंवा सांभारबरोबर खाऊ शकता. याशिवाय हिरवी चटणीसुद्धा  उत्तम आहे. तुम्ही बेसनाची इडली राई-जीऱ्याची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊनही खाऊ शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स