Lokmat Sakhi >Food > बेसनाचे लाडू करायचेय, हे घ्या परफेक्ट कृती प्रमाण आणि १ ट्रिक, बेसनाचे लाडू चुकणारच नाहीत!

बेसनाचे लाडू करायचेय, हे घ्या परफेक्ट कृती प्रमाण आणि १ ट्रिक, बेसनाचे लाडू चुकणारच नाहीत!

Besan ke Laddu Recipe (Easy Diwali 2024 Sweet) : दाणेदार - मऊसूत बेसनाचे लाडू करण्याची पाहा सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 10:00 AM2024-10-29T10:00:00+5:302024-10-29T10:00:02+5:30

Besan ke Laddu Recipe (Easy Diwali 2024 Sweet) : दाणेदार - मऊसूत बेसनाचे लाडू करण्याची पाहा सोपी पद्धत

Besan ke Laddu Recipe (Easy Diwali 22024 Sweet) | बेसनाचे लाडू करायचेय, हे घ्या परफेक्ट कृती प्रमाण आणि १ ट्रिक, बेसनाचे लाडू चुकणारच नाहीत!

बेसनाचे लाडू करायचेय, हे घ्या परफेक्ट कृती प्रमाण आणि १ ट्रिक, बेसनाचे लाडू चुकणारच नाहीत!

दिवाळी (Diwali 2024) म्हटलं की लाडू हमखास केले जातात (Faral). लाडू हा पदार्थ अनेकांना आवडतो (Diwali Laddoo). लाडू अनेक प्रकारचे केले जातात. रव्याचे (Rava Laddoo) आणि बेसनाचे लाडू हमखास केले जातात. अधिक घरांमध्ये बेसनाचे लाडू आवर्जून केले जातात. पण बेसनाचे लाडू मनासारखे तयार होतीलच असे नाही. बेसानाचे लाडू कधी टाळूला चिकटतात, तर कधी जास्त तुपकट होतात. ज्यामुळे ते नीट वळले जात नाही.

बेसनाचे लाडू चवीला भन्नाट लागतात. पण बिघडत असल्यामुळे बरेच जण करणं टाळतात. जर आपल्याला परफेक्ट बेसनाचे लाडू करायचे असतील तर, काही टिप्स लक्षात ठेवा. या टिप्समुळे आणि योग्य प्रमाणाचा वापर केल्याने लाडू पौष्टीक आणि परफेक्ट होतील. बेसनाचे परफेक्ट लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहा(Besan ke Laddu Recipe (Easy Diwali 22024 Sweet)).

बेसनाचे परफेक्ट लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

ड्रायफ्रुट्स

स्मरणशक्ती वाढवायची आहे? ‘या’ ४ पैकी १ पदार्थ रोज खा, मेंदू होईल तल्लख

पिठीसाखर

रवा

तूप

कृती

सर्वात आधी एका कढईत ३ वाट्या बेसन घाला. बेसन छान भाजून घ्या. बेसन भाजून घेतल्यानंतर ड्रायफ्रुट्स बारीक चिरून घ्या. आपण फक्त काजू आणि बदामाचाही वापर करू शकता. नंतर खलबत्ता घ्या. त्यात वेलची घालून ठेचून घ्या. आपण वेलची पावडरही वापरू शकता.


बेसन भाजून घेतल्यानंतर वाटीभर तूप घाला. नंतर त्यात एक कप रवा. बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालून चमच्याने एकजीव करा. तयार मिश्रण एका परातीत काढून घ्या, आणि चमच्याने पसरवा. मिश्रण पसरवल्यानंतर त्यात वाटीभर पिठीसाखर घाला. आणि हाताने साहित्य एकजीव करा. 

आदित्य रॉय कपूर म्हणतो, मला ‘अशी’ जोडीदार हवी, चिडकी रडकी अजिबात नको कारण..

साहित्य एकजीव केल्यानंतर हाताला थोडे तूप लावा. थोडे मिश्रण घ्या, आणि लाडू छान वळवून घ्या. लाडू वळवताना आपण त्यावर मनुका देखील ठेऊ शकता. अशा प्रकारे दिवाळीनिमित्त खास बेसनाचे लाडू खाण्यासाठी रेडी.

Web Title: Besan ke Laddu Recipe (Easy Diwali 22024 Sweet)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.