Join us  

Best Cooking Oil : घरात माणसं किती आणि तुम्ही तेल किती वापरता? चांगल्या तब्येतीसाठी किती, कोणतं तेल वापरावं? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 11:00 AM

Best Cooking Oil : आरोग्यासाठी कोणते तेल उत्तम आहे, हा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. याबाबत प्रत्येकाचे मत वेगळे आहे आणि सल्लाही.

आजकाल खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये खूप भेसळ झाल्याचं दिसून येतंय. गेल्या काही वर्षांत आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये झपाट्याने बदल होत आहेत, त्यासोबतच लोकांमध्ये हेल्दी डाएट, क्वाटीली फूडबाबत जागरूकताही वाढली आहे. लोक आहारातही आरोग्यदायी आहाराच्या पर्यायांचा अवलंब करू लागले आहेत. (Which cooking oil is good for health) भारतीय जेवणात तेल आणि तूप जास्त वापरतात. पारंपारिक तुपाशिवाय शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफूल, नारळ, मोहरी इत्यादींचे तेल अन्न शिजवण्यासाठी वापरले जाते. आजकाल इतर अनेक पर्याय भारतीय स्वयंपाकघरात झपाट्याने स्थान निर्माण करत आहेत. (which oil is best for cooking) 

आरोग्यासाठी कोणते तेल उत्तम आहे, हा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. याबाबत प्रत्येकाचे मत वेगळे आहे आणि सल्लाही. हेच कारण आहे की आता भारतातही राईस ब्रॅन ऑईल, ऑलिव्ह ऑईल, कॅनोला ऑईल, तिळाचे तेल, जवस तेल इत्यादींचा वापर स्वयंपाकासाठी केला जात आहे. तेलाच्या अतिवापराबाबत आहारतज्ज्ञही चिंतेत आहेत. 

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुपाप्रमाणेच तेलाचा संतुलित प्रमाणात वापर पोषणासाठीही आवश्यक आहे. जर तुम्ही रोज थोडे तेल वापरत असाल तर कोणतेही तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अन्नात तेलाचा वापर वाढला की अडचण निर्माण होते. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्वयंपाकाच्या तेलात स्मोकिंग पॉइंट असतो. ज्या तापमानात तेल स्थिर राहू शकत नाही. स्मोकिंग पॉईंटवर आल्यावर, कोणतेही तेल ऑक्सिडाइझ होऊ लागते, फ्री रॅडिकल्स सोडते. हे फ्री रॅडिकल्स शरीरासाठी हानिकारक मानले जातात.

तज्ज्ञांच्या मते स्मोकिंग पॉइंटनंतर तेलाचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. इतकंच नाही तर स्मोकिंग पॉईंटमधून गेल्यावर तेलातून एक्रोलिन नावाचा पदार्थही बाहेर पडतो ज्यामुळे फुफ्फुसांना गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नये.

तेलाची निवड करताना हे लक्षात ठेवा

रिफाइंड ऑईलचा सगळेचजण वापर करतात पण प्रोसेसिंगदरम्यान यातील पोषक तत्व नष्ट होण्याचा धोका जास्त असतो. 

अनरिफाइंड ऑयलमध्ये पोषक तत्व असतात पण ते कमी स्मोकींग पॉईंट्सवाले असतात.  म्हणूनच अशा प्रकारच्या तेलांचा वापर विचारपूर्वक करायला हवा. 

तुम्ही ज्या तेलाचा वापर करताय ते तेल वनस्पतीपासून तयार केलंय का? की रासायनिक पदार्थांचा वापर त्यात आहे हे माहीत करून घ्या.

चांगल्या तब्येतीसाठी कोणतं तेल उत्तम?

१) ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन-ई भरलेले असते आणि त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. मोनोसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यात कॅन्सरविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते.

२) फ्लेक्ससीड ऑइल किंवा फ्लॅक्ससीड ऑइल देखील अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की ते ओमेगा -3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध आहे, जे सहसा शाकाहारी आहारातून फारच कमी प्रमाणात आढळतात. हे विशेषतः संधिवात लक्षणे नियंत्रित करण्यास मदत करू शकते. याव्यतिरिक्त, त्यात विशेषतः ओमेगा -6 फॅटी ऍसिड असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

३) राईस ब्रॅन ऑइल हा देखील आजकाल आरोग्याबाबत जागरूक लोक वापरत असलेला पर्याय आहे. यामध्ये पॉली आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच हृदयविकारांपासून बचाव होतो आणि टाइप-2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो.

या प्रकारच्या तेलांचा वापरही करू शकता

तिळाच्या तेलात अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. हे विशेषतः पार्किन्सन रोगासारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांपासून संरक्षण करण्यात भूमिका बजावते. रक्तातील साखरेच्या व्यवस्थापनातही हे फायदेशीर मानले जाते.

सूर्यफूल तेल वर्षानुवर्षे वापरले जात आहे. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असल्याने ते अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. हे रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यांसारख्या परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. 

याशिवाय अॅव्होकॅडो तेल, सोयाबीन तेल, कॅनोला तेल, अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीनेही गुणकारी आहेत.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न