Lokmat Sakhi >Food > जन्माष्टमी स्पेशल : नैवेद्याचे 'हे' पदार्थ म्हणजे तब्येतीसाठी वरदान, खा मनसोक्त आणि सुधारेल आरोग्य...

जन्माष्टमी स्पेशल : नैवेद्याचे 'हे' पदार्थ म्हणजे तब्येतीसाठी वरदान, खा मनसोक्त आणि सुधारेल आरोग्य...

Best health benefits of eating Janmashtami prasad : Know Amazing Health Benefits Of Lord Krishna's Favourite Food : नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे हे पदार्थ तुमच्या आरोग्यालाही ठरतील लाभदायक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 12:16 PM2024-08-26T12:16:43+5:302024-08-26T12:29:42+5:30

Best health benefits of eating Janmashtami prasad : Know Amazing Health Benefits Of Lord Krishna's Favourite Food : नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे हे पदार्थ तुमच्या आरोग्यालाही ठरतील लाभदायक...

Best health benefits of eating Janmashtami prasad Know Amazing Health Benefits Of Lord Krishna's Favourite Food | जन्माष्टमी स्पेशल : नैवेद्याचे 'हे' पदार्थ म्हणजे तब्येतीसाठी वरदान, खा मनसोक्त आणि सुधारेल आरोग्य...

जन्माष्टमी स्पेशल : नैवेद्याचे 'हे' पदार्थ म्हणजे तब्येतीसाठी वरदान, खा मनसोक्त आणि सुधारेल आरोग्य...

आज कृष्ण जन्माष्टमीचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा केली जाते. कृष्ण जन्मानिमित्त आपल्या सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे गोडाधोडाचे पदार्थ तयार केले जातात. अशावेळी बाळकृष्णाला आवडणाऱ्या पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात. या दिवशी अनेकजण उपवास करुन श्रीकृष्णाची पूजा करतात(Best health benefits of eating Janmashtami prasad).

या दिवशी श्रीकृष्णाला पंचामृत, माखन मिश्री, धनिया पंजीरी आणि फळं यांसारख्या पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात येतात. तसेच प्रसाद म्हणूनही हे पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ खाण्यासाठी जेवढे चविष्ट असतात तेवढेचं आरोग्यासाठीही लाभदायक असतात. यांमुळे डायबिटिज, लठ्ठपणा आणि इन्फेक्शनसारख्या आजारांपासून आपला बचाव होतो. न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटीशियन शिखा ए शर्मा या श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणाऱ्या पदार्थांचे आरोग्यदायी फायदे सांगत आहेत(Know Amazing Health Benefits Of Lord Krishna's Favourite Food).

श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणाऱ्या पदार्थांचे आरोग्यदायी फायदे... 

१. पंचामृत:- जन्माष्टमीला श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणाऱ्या या प्रसादामध्ये दही, मध आणि दूध यांसारखे पदार्थ वापरण्यात येतात. या सर्व पदार्थांमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला झालेल्या कोणत्याही इन्फेक्शनपासनू बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

२. नारळ :- नारळामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर आणि मिनरल्स यांसारखी अनेक पोषक तत्व फार मोठ्या प्रमाणात असतात. तसेच नारळातील खोबरं आणि त्याच्यापासून तयार केलेलं पदार्थ खाल्ल्याने मेंदूला चालना मिळते आणि वजनही नियंत्रणात राहते.

जन्माष्टमी स्पेशल : 'माखन मिश्री' करा झ्टपट, कान्हाच्या नैवेद्यासाठी खास पारंपरिक पदार्थ, गोड असे खी खावे पोटभर...

३. माखनमिश्री :- दूधापासून तयार करण्यात आलेलं लोणी आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. प्रसादाच्या रूपात देण्यात येणारा हा पदार्थ खाल्याने शरीराला ताकद आणि उर्जा मिळते. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठीही हा पदार्थ फायदेशीर ठरतो.

४. धनिया पंजीरी :- शुद्ध तुपामध्ये धने किंवा धण्याची पावडर घालून हा पदार्थ तयार करण्यात येतो. याव्यतिरिक्त यांमध्ये ड्रायफ्रुट्स देखील घातले जातात. ज्यामुळे हा हेल्दी प्रसाद मानला जातो. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्याचप्रमाणे हा पदार्थ खाल्याने ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तसेच इन्फेक्शनपासूनही आपला बचाव करण्यात येतो. 

मोड आलेल्या मुगाचा ढोकळा, ही घ्या कपभर मुगाची खास रेसिपी पौष्टिक ‘ग्रीन ढोकळा!’

५. फळं :- या प्रसादामध्ये केळी, सफरचंद आणि मोसंबी यांसारखी फळं एकत्र केली जातात. फळांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट, फायबर यांसारखी पोषक तत्व असतात. फळांमधील ही पोषक तत्व लठ्ठपणा, डायबिटीज आणि हृदयाशी निगडीत आजारांपासून शरीराचं रक्षण करतात.

Web Title: Best health benefits of eating Janmashtami prasad Know Amazing Health Benefits Of Lord Krishna's Favourite Food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.