दाक्षिणात्य (South Indian Recipe) पद्धतीचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात (Breakfast recipe). शिवाय हे पदार्थ पौष्टीकही असतात. सकळच्या नाश्त्याला आपण इडली, डोसा हमखास खातो (Poha - moong daal appe). शिवाय मेदू वडे आणि आप्पेही चवीने खाल्ले जतात. डाळ - तांदुळाला भिजत घालून आप्पे केले जातात.
डाळ - तांदूळ भिजत घालून अप्प्पे करताना बराच वेळ जातो. काही लोक शॉर्टकट्स वापरून इन्स्टंट आप्पे तयार करतात. जर सकाळची घाई असेल आणि आपल्याला आप्पे खाण्याची इच्छा झाली असेल तर, इन्स्टंट आप्पे करून पाहा. रव्याचे न करता आपण पोहे आणि मूग डाळीचे पौष्टीक आप्पे करून पाहू शकता(Best High Protein Breakfast | Moong Dal Poha appe Recipe).
मूग डाळीमध्ये फोलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी ६ सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. शिवाय यात प्रोटीनचे प्रमाणही जास्त असते. जर आपण वेट लॉस करत असाल तर, पोहे - मूग डाळीचे पौष्टीक आप्पे करून पाहा. काही मिनिटात कुरकुरीत पोहे रेडी होतील.
पोहे - मूग डाळीचे कुरकुरीत आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य
मूग डाळ
आप्पे
पाणी
कांदा
सिमला मिरची
टोमॅटो
गाजर
कोथिंबीर
मक्याचे दाणे
हिरवी मिरची - लसूण पेस्ट
मीठ
लिंबाचा रस
तेल
कृती
सर्वात आधी मोठ्या बाऊलमध्ये एक कप मूग डाळ घ्या. त्यात एक वाटी पोहे घालून मिक्स करा. त्यात पाणी घाला. आणि ४ ते ५ तासांसाठी भिजत ठेवा.
दुसरीकडे सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, गाजर आणि आपल्याला आवडणाऱ्या भाज्या चिरून घ्या. भाज्या बारीक चिरून घ्या. नंतर त्यात पाणी घालून भाज्या धुवून घ्या.
मूग डाळ - पोहे भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, आणि त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेल्या भाज्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, मक्याचे दाणे, हिरवी मिरची - लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय
दुसरीकडे गॅसवर आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा. त्याला ब्रशने तेल लावा. पात्र गरम झाल्यानंतर त्यात चमचाभर बॅटर ओतून, झाकण लावा. २ मिनिटानंतर दोन्ही बाजूने आप्पे भाजून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत आप्पे खाण्यासाठी रेडी.