Join us  

हिवाळ्यात सतत सर्दी- खोकल्याचा त्रास, वारंवार आजारपण नको तर प्या खास सरबत, प्रतिकारशक्ती राहील उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 4:57 PM

Health Tips For Winter: हिवाळ्यात सर्दी, खाेकला, ताप असे संसर्गजन्य आजार कायम होत असतात. हे आजार होऊ नये, म्हणून हे खास सरबत नेहमीच घेत चला. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (immunity booster juice for winter season) 

ठळक मुद्दे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. आवळ्याला बेस्ट ॲण्टीएजिंग फ्रूट म्हणून ओळखलं जातं. 

हिवाळा आणि सर्दी- खोकला, ताप हे एक समीकरणच आहे. एकदा सर्दी- खाेकल्याचा त्रास सुरू झाला की त्यामध्ये आठवडा निघून जातो. म्हणून हे आजार होऊच नयेत, यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणं हे सगळ्यात उत्तम. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नेमकं काय करायचं, याचा उपाय इन्स्टाग्रामच्या fitnesswithnidhi या पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यांनी सांगितलेली २ चवदार सरबतं (immunity booster juice for winter season) हिवाळ्यात नेहमीच घ्या आणि तुमची इम्युनिटी वाढवा.(How to boost immunity in winter season?)

 

रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी सरबते१. आवळा- गाजर सरबतहे सरबत करण्यासाठी २ आवळे आणि एक मध्यम आकाराचं गाजर घ्या. त्यांचे तुकडे करून घ्या. ते तुकडे आणि पाणी असं  मिक्सरमध्ये टाकून त्याचा ज्सूस करून घ्या.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका. चवीनुसार थोडीशी साखर घाला. थोडा चाटमसाला आणि थोडंसं मीठ टाका. सकाळी रिकाम्यापोटी हे सरबत घ्यावं. 

२. आवळा- बीट सरबत याची रेसिपी वरीलप्रमाणेच आहे. २ आवळ्याचे तुकडे, २ ते ३ बीटच्या फोडी थोडंसं आलं मिक्सरमध्ये टाका. त्यात थोडं पाणी घाला आणि अगदी बारीक फिरवून त्याचा ज्यूस करून घ्या. यातही आवडीप्रमाणे थोडी साखर, चाट मसाला, थोडंसं मीठ टाकू शकता. हे सरबतही सकाळी रिकाम्यापोटी घ्यावं.

 

आवळा- गाजर- बीट सरबत पिण्याचे फायदे१. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. 

२. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच त्यातून मोठ्या प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात.

शिल्पा शेट्टीच्या व्हायरल डाएट प्लॅनची चर्चा, दिवसातून किती वेळा आणि काय खाते नेमकं, फिटनेस सिक्रेट

३. आवळा आणि गाजरामुळे केस मजबूत होण्यास फायदा होतो. केसांची चांगली वाढ होते. तसेच डोक्यातील कोंडाही कमी होतो.

४. आवळ्याला बेस्ट ॲण्टीएजिंग फ्रूट म्हणून ओळखलं जातं. 

५. आवळ्यामुळे शरीरातील LDL म्हणजेच बॅड कोलेस्टरॉल कमी होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही आवळा उपयुक्त ठरतो.

६. गाजर आणि आवळा डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीथंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्स