Join us  

कापसाहून हलका मऊमस्त ढोकळा खायचाय? मिक्सरमध्ये ‘असं’ फिरवा पीठ-१५ मिनिटांत खा स्पॉन्जी ढोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 10:00 AM

Best Instant Dhokla Recipe | Soft, Fluffy Dhokla | Step-by-step : बेसनाचा इन्स्टंट ढोकळा आपण मुलांच्या डब्यालाही देऊ शकता..

नाश्त्याला (Nashta Recipe) काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होतेच (Breakfast Recipe). रोजचे पोहे, उपमा, इडली, डोसे किंवा चपाती - भाजी आपण खातोच. पण याही व्यतिरिक्त काहीतरी हटके खायचं असेल तर, आपण गुजराथी पदार्थ खातो (Gujrathi Food). गुजराथी पदार्थामध्ये खमण ढोकळा हा पदार्थ फार फेमस आहे (Khaman Dhokla). जो फक्त गुजरातमध्ये नसून, संपूर्ण भारतभर फेमस आहे.

खमण ढोकळा अनेक प्रकारचे केले जातात. पण दुकानात मिळतो तसा स्पंजी ढोकळा घरी तयार होत नाही. सॉफ्ट, स्पॉन्जी खमन ढोकळा आपल्याला करायचा असेल तेही डाळ - तांदूळ भिजत न घालता, तर ही रेसिपी फॉलो करून पाहा. अगदी मिनिटात सॉफ्ट, स्पॉन्जी खमन ढोकळा तयार होईल. यासाठी विशेष साहित्यांची गरज नाही(Best Instant Dhokla Recipe | Soft, Fluffy Dhokla | Step-by-step).

सॉफ्ट, स्पॉन्जी खमन ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

पाणी

हळद

मीठ

लिंबाचा रस

हिरव्या मिरच्या

तेल

साखर

स्वयंपाकघराच्या खिडक्या कितीही घासल्या तरी मेणचट? बेकिंग सोड्याचा १ सोपा उपाय; खिडकी होईल स्वच्छ

इनो

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक कप बेसन घ्या. त्यात अर्धा कप पाणी घाला. नंतर त्यात छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, २-३ हिरव्या मिरच्या, ३-४ टेबलस्पून तेल आणि चवीनुसार साखर घाला. नंतर मिक्सर २- ३ वेळा फिरवून घ्या.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

तयार गुळगुळीत पेस्टमध्ये एक चमचा इनो घाला. त्यात २ चमचे पाणी घालून चमच्याने ढवळत राहा. एका भांड्याला ब्रशने चमचाभर तेल लावा. जेणेकरून ढोकळा भांड्याला चिकटणार नाही. आता त्यात बॅटर ओता. स्टीमरमध्ये पाणी गारम करण्यासाठी ठेवा. त्यात भांडं ठेवा. आणि झाकण लावा. १५ मिनिटं वाफेवर ढोकळा शिजवा. १५ मिनिटांनंतर ढोकळा शिजल्यावर बाहेर काढा. त्याला कट करून तयार जिरं, मोहरी आणि हिरव्या मिरचीची फोडणी ओता. अशा प्रकारे बेसानाचा झटपट ढोकळा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स