Join us  

सकाळी की रात्री? दूध पिण्याची योग्यवेळ कोणती; जास्तीत जास्त फायदे मिळण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 9:07 AM

Best Milk Drinking Time : दूध नेमकं कधी प्यावं? सकाळी की रात्री? वेळ चुकली की फायदे तोटे बदलतात का?

आपल्या आहारात दूध किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीतच असेल.  याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. यामुळेच दुधाचे सेवन मुख्यत्वे लहान मुले आणि प्रौढांच्या आरोग्यासाठी महत्वाचे ठरते.  दूध प्याल्याने आपले संपूर्ण शरीर निरोगी राहते आणि दूध मुलांसाठी खूप महत्वाचे मानले जाते कारण यामुळे त्यांची वाढ जलद होते.  (Right Time to drink milk) बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात. (What is the best time to drink milk)

त्याच वेळी, काही लोक आहेत जे सकाळी रिकाम्या पोटी दूध पितात. दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती हे अनेकांना माहिती नसले तरी या प्रश्नावर ते संभ्रमात राहतात. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर आयुर्वेदानुसार दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे. (The best time to drink milk to get maximum benefits) हे समजून घ्या.

दूध पिण्याची योग्यवेळ कोणती?

आयुर्वेदानुसार, प्रौढांसाठी दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ झोपण्यापूर्वी आहे. दुसरीकडे, जेव्हा मुलांचा विचार केला जातो, तेव्हा त्यांच्यासाठी दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी. प्रौढांनी झोपण्यापूर्वी दूध प्यायल्यास त्यांना चांगली झोप येण्यास मदत होते. यासोबतच त्यांची पचनक्रियाही निरोगी राहते. याचे कारण असे आहे की जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीरात क्रिया कमी होते आणि यामुळेच कॅल्शियम शरीरात शोषले जाते. म्हणूनच प्रौढांना रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.

गरम की थंड तब्येतीसाठी कोणतं दूध चांगलं

आयुर्वेदात फळांसोबत दूध कधीही सेवन करू नये असे सांगितले आहे. म्हणजेच दुधात फळे मिसळू नयेत. त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. विशेष म्हणजे, आपण थंड दूध प्यावे की गरम प्यावे, हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होतो.  दूध थंड आणि गरम दोन्ही प्यायल्याने आपल्या शरीराला पोषक तत्वे मिळतात. तुम्ही दूध किती वाजता पिताय यावर ते अवलंबून असले तरी. जर तुम्ही दिवसा दूध घेत असाल तर तुम्ही थंड आणि गरम दोन्ही दूध पिऊ शकता. 

एका हिंदी वेबसाईटशी बोलताना  डॉक्टर सिमरन सैनी यांनी सांगितले की, आपण सकाळी दूध प्यावे. कारण दूध पचायला जड असते. सकाळी दूध प्यायल्याने ते सहज पचते. सकाळी दूध प्यायल्याने शरीरात दिवसभर एनर्जी राहते, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते. जर तुम्हाला दमा किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर रात्री दूध पिणे टाळावे कारण त्यामुळे तुम्हाला कफ जास्त  होतो आणि सांध्यांना सूज येऊ शकते.''

सर्दी, ॲलर्जी यामुळे डोळे चुरचुरतात, लाल होतात? पावसाळ्यात काय काळजी घ्याल, डॉक्टर सांगतात..

जर तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल तर रात्री दूध पिणे चांगले मानले जाते. यामुळे शरीराचा दिवसभराचा थकवा दूर होतो आणि दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असल्यामुळे स्लीप हार्मोनची पातळी वाढण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते.

टॅग्स :दूधअन्नहेल्थ टिप्स