Lokmat Sakhi >Food > Best Oil for Cooking : रोज किती तेल वापरता? जेवणात 'या' तेलाचा वापर केल्यास ६० टक्क्यांनी कमी होईल हदयरोगाचा धोका

Best Oil for Cooking : रोज किती तेल वापरता? जेवणात 'या' तेलाचा वापर केल्यास ६० टक्क्यांनी कमी होईल हदयरोगाचा धोका

Best Oil for Cooking : कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणते, ज्यामुळे अवयवांमध्ये रक्त परिसंचरण अडथळा निर्माण होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:45 PM2021-11-05T12:45:12+5:302021-11-05T12:50:02+5:30

Best Oil for Cooking : कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणते, ज्यामुळे अवयवांमध्ये रक्त परिसंचरण अडथळा निर्माण होतो.

Best Oil for Cooking : How olive oil is beneficial for heart health know what study says | Best Oil for Cooking : रोज किती तेल वापरता? जेवणात 'या' तेलाचा वापर केल्यास ६० टक्क्यांनी कमी होईल हदयरोगाचा धोका

Best Oil for Cooking : रोज किती तेल वापरता? जेवणात 'या' तेलाचा वापर केल्यास ६० टक्क्यांनी कमी होईल हदयरोगाचा धोका

खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अलिकडच्या वर्षांत हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सुमारे दशकभरापूर्वी वयाशी संबंधित आजार म्हणून ओळखल्या जाणार्‍या हृदयविकाराचे आता तरुणांमध्येही निदान होत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वाढत्या कोलेस्टेरॉलची पातळी सर्व वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढवत आहे. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने कोरोनरी धमनी रोग, हृदय अपयश, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणते, ज्यामुळे अवयवांमध्ये रक्त परिसंचरण अडथळा निर्माण होतो. (How olive oil is beneficial for heart health know what study says)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या तर हृदयविकाराचा धोका ६० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करणाऱ्या गोष्टींचा आहारात नेहमी समावेश करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोजच्या खाद्यतेलात बदल करून तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. 

आहार कसा असायला हवा?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारातील चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. सर्वसाधारणपणे, चरबीचे दोन प्रकार आहेत - सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड फॅट खूप खारट किंवा खूप गोड पदार्थांमध्ये आढळते तर अनसॅच्युरेटेड फॅट नट, बिया आणि ऑलिव्ह ऑइल इत्यादींमध्ये आढळते. अनसॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

रात्रीच्या जेवणानंतर 'या' चुका कराल तर तुमचंही भरभर वाढेल वजन; हा घ्या मेटेंन राहण्याचा सोपा मंत्र

ऑलिव्ह ऑईलचं सेवन फायदेशीर

मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, ऑलिव्ह ऑईलचे सेवन इतर तेलांच्या तुलनेत जेवणात केले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाऊ शकते. ऑलिव्ह ऑइल खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हार्वर्डच्या तज्ज्ञांनी सांगितले की, ऑलिव्ह ऑईलचा आहारात वापर करणे तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

ऑलिव्ह ऑइलमध्ये 75 टक्के मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आढळतात. मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी म्हणून ओळखले जातात. याशिवाय ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात जे हृदयाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अभ्यासात असे आढळून आले आहे की ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने कर्करोग आणि स्मृतिभ्रंशाचा धोका देखील कमी होतो.

 शुगर फ्री पदार्थ असं खरंच काही असतं का? दिवाळीत शुगर फ्री खाण्यापूर्वी बघा डॉक्टर काय म्हणतात..

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ऑलिव्ह ऑईलचा आहारात अनेक प्रकारे समावेश करून जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात. उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर सॅलडमध्ये किंवा अन्न शिजवण्यासाठी केला जाऊ शकतो. कर्करोग आणि यकृताचे आजार कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचे सेवन फायदेशीर मानले जाते.

Web Title: Best Oil for Cooking : How olive oil is beneficial for heart health know what study says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.