Join us  

वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी नेमकं कोणतं तेल वापरावं? तज्ज्ञ सांगतात योग्य तेल निवडण्याची पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2024 8:37 PM

Best Oils For Cooking As Per Ayurveda Different Ways To Use : Best Oils to Cook With : तेलांच्या प्रकारानुसार, असे तेल नेमका कोणता पदार्थ बनवण्यासाठी वापरायचे, ते पाहूयात.. 

रोजचा स्वयंपाक करायचा म्हटलं की आपल्याला तेलं लागतच. भाज्यांना फोडणी देण्यापासून कणीक मळेपर्यंत सगळेच पदार्थ तयार करताना आपण तेलं वापरतो. शक्यतो तेलाचा वापर करताना आपण अमुक एका प्रकारचेच तेल विकत घेतो, आणि तेच तेल सगळे पदार्थ तयार करण्यासाठी वापरतो(Best Oils to Cook With).

काहीजण सूर्यफुलांच्या बियांचे तेल, शेंगदाण्याचे तेल, तिळाचे तेल अशा वेगवेगळ्या प्रकारची तेलं स्वयंपाक करण्यासाठी वापरतात. परंतु आयुर्वेदानुसार, तेलाच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार, वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी या तेलांचा वापर करणे योग्य आहे. याचाच अर्थ, पदार्थ शिजवण्यासाठी अमुक एक प्रकारचे तेल, तसेच तळण्यासाठी वेगळे तेल अशाप्रकारे तेलांच्या प्रकारानुसार ते तेल नेमका कोणता पदार्थ बनवण्यासाठी वापरायचे हे ठरवले जाते. याबाबत अधिक  माहिती देताना आयुर्वेदिक डॉक्टर वरलक्ष्मी यनामंद्रा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये त्या कोणत्या प्रकारचे तेल कोणते पदार्थ तयार करण्यासाठी वापरावेत ते पाहूयात(Best Oils For Cooking As Per Ayurveda Different Ways To Use).

१. अस्सल घरगुती तूप :- अस्सल घरगुती तूप हे आयुर्वेदात सर्वात फायदेशीर मानले जाते. त्याचा स्मोकिंग पॉईंट जास्त असतो आणि यातून आपल्याला शरीराला हेल्दी फॅट्स फार मोठ्या प्रमाणांत मिळतात. डाळ, भाजी किंवा खिचडीत आपण तूप घालून खाऊ शकता. या व्यतिरिक्त, तूप कोणताही पदार्थ   तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील संसर्ग रोखण्यास मदत करतात.

२. नारळाचे तेल :- भारताच्या दक्षिण भागात, बहुतेक लोक स्वयंपाकासाठी नारळाच्या तेलाचा वापर करतात. हेल्दी फॅट्स सोबतच यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील फार मोठ्या प्रमाणात असतात. नारळाचे तेलं अन्नपदार्थ शिजवण्यासाठी आणि भाजण्यासाठी वापरले जाते. पण स्वयंपाकात कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी जर नारळाचे तेलं वापरत असाल तर ते कमी प्रमाणात वापरावे. 

वाळून कडक झालेले डाळिंब सोलण्याची ट्रिक, दाणे निघतील सरसर आणि रसही गळणार नाही...

३. तिळाचे तेल :- पूजेशिवाय तिळाचे तेल स्वयंपाकासाठीही वापरले जाते. त्याचा स्मोकिंग पॉइंटही जास्त असतो. तिळाच्या तेलात लिक्विड फॅट्सचे प्रमाण अधिक असते जे आपले शरीर आणि त्वचेसाठी आवश्यक असते. रोजचा स्वयंपाक करण्यासाठी आणि पदार्थ तळण्यासाठी आपण तिळाच्या तेलाचा वापर करु शकता. 

४. मोहरीचे तेल :- मोहरीचे तेल बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरले जाते. परंतु आयुर्वेदनुसार मोहरीचे तेल पचनासाठी जड मानले जाते. याचबरोबर मोहरीचे तेल फार उष्ण असते. याच्या जास्त वापराने आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते, म्हणून मोहरीचे तेल रोजच्या स्वयंपाकासाठी न वापरता  अधूनमधून स्वयंपाक करण्यासाठी वापरावे.

उरलेल्या सोनपापडीचा करा झक्कास केक! पटकन तयार होणारा इन्स्टंट पदार्थ, सॉफ्ट-स्पॉंजी केक मुलंही खातील आवडीने...

५. शेंगदाणा तेल :- शेंगदाण्याचे तेल देखील स्वयंपाकासाठी वापरले जाते. हे तेल महाग असण्यासोबतच शरीरासाठी फायदेशीर असते. तर तेलांच्या तुलनेत शेंगदाण्याचे तेल पचनासाठी जड असण्यासोबतच शरीराला हायड्रेट ठेवण्यासही मदत करते. या तेलाचा वापर आपण प्रामुख्याने पदार्थ तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी करु शकतो. 

६. ऑलिव्ह ऑइल :- ऑलिव्ह ऑइलमध्ये ओमेगा - ३ फॅटी ॲसिड असते, जे आरोग्यासाठी आवश्यक असते. ऑलिव्ह ऑइल कोणताही पदार्थ भाजण्यासाठी किंवा दररोज स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

करा विड्याच्या पानांचा घरगुती मुखवास, जेवणानंतर गोड खावंसं वाटल्यास मुखवासचा बेस्ट ऑप्शन...

अशा प्रकारे तुम्ही स्वयंपाकासाठी विविध प्रकारच्या तेलांचा वापर करु शकता. पण लक्षात ठेवा की तुम्ही जे तेल वापरता ते कमी प्रमाणात वापरा. कोणतेही तेल जास्त वापरल्याने तुमचे वजन आणि कोलेस्ट्रॉलची पातळी दोन्ही वाढू शकते.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स