Protein Rich Foods : आपण रोज काय खातो त्याचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडत असतो. त्यामुळेच डॉक्टर नेहमीच निरोगी आणि फिट राहण्यासाठी हेल्दी आहार घेण्याचा सल्ला देत असतात. कारण यातून शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. वाढत्या वयातही तुम्ही फिट राहता.
शरीराचा योग्य विकास आणि आरोग्यासाठी प्रोटीन एक महत्वाचं पोषक तत्व असतं. मात्र, प्रोटीनचा विषय निघाला की, सगळ्यांना हेच वाटतं की, प्रोटीनची गरज केवळ बॉडी बिल्डर किंवा पुरूषांनाच असते. पण हा गैरसमज आहे. महिलांनाही प्रोटीनची तेवढीच गरज असते, जेवढी पुरूषांना. प्रोटीनच्या मदतीनं शरीरात नवीन कोशिका बनण्यास मदत मिळते. सोबतच टिश्यू तयार करण्यास आणि त्यांना रिपेअर करण्यातही प्रोटीनची महत्वाची भूमिका असते.
जर तुम्ही पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेत नसाल तर इम्यूनिटी कमजोर होणं, डायरिया, त्वचेच्या रंगात बदल, थकवा, कमजोरी, चिडचिडपणा वाढणं अशा आणि इतरही काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात आज आम्ही तुम्हाला ५ अशा प्रोटीन रिच फूड्सबाबत सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता.
महिलांना किती प्रोटीनची गरज?
महिलांचं डेली प्रोटीन इनटेक त्यांच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम ०.७५ ग्रॅम असायला हवं. अमेरिकेतील आहार दिशा-निर्देशांनुसार, वयस्कांनी रोज त्यांच्या एकूण कॅलरीचा १० ते ३५ टक्के भाग प्रोटीनमधून घेतला पाहिजे. प्रोटीनची गरज ही वय, वजन, शरीराची हालचाल आणि हेल्थ हिस्ट्रीवर अवलंबून असते.
डाळी आणि बीन्स
मूग डाळ, उडीद डाळ, चणा डाळ आणि मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. FDA नुसार, एक कप शिजवलेल्या मसूर डाळीमध्ये १७.९ ग्रॅम प्रोटीन असतं. त्याशिवाय राजमा आणि छोले यातूनही शाकाहारी लोक प्रोटीन मिळवू शकता.
नट्स आणि सीड्स
प्रोटीन रिच फूड्सच्या या यादीत नट्स आणि सीड्स यांचाही समावेश केला जातो. रोज प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही बदाम, अक्रोड, काजू, सूर्यफुलाच्या बीया आणि चिया सीड्स खाऊ शकता.
दूध आणि डेअरी प्रोडक्ट्स
दूध आणि डेअरी प्रोडक्ट्समधूनही भरपूर प्रोटीन मिळतं. रोज आहारात फॅट मिल्कसोबतच पनीर, दही यांचाही समावेश केला तर प्रोटीन मिळतं.
सोयाबीन
प्रोटीन मिळवण्याचा आणखी मार्ग म्हणजे सोयाबीन. साधारण १७५ ग्रॅम उकडलेल्या सोयाबीनमध्ये ३१ ग्रॅम प्रोटीन असतं. सोयाबीन शाकाहारी आणि वीगन डाएट फॉलो करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहेत.
ओट्स
ओट्स भरपूर लोक सकाळी नाश्त्यात खातात. ज्यांना त्यांची लाइफस्टाईल हेल्दी ठेवायची असेल त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये ओट्सचा समावेश केला पाहिजे. यातून भरपूर प्रोटीन मिळतं.