सकाळी उरलेल्या पोळ्या (baasi roti) रात्री खायच्या म्हटलं की कधी कधी अगदीच कंटाळा येतो. चवीत बदलही व्हावा आणि अन्नही वाया जाऊ नये, म्हणून मग उरलेल्या पोळ्यांचा मग छानपैकी कुस्करा करतो. पण कुस्करा तर आपला नेहमीचाच.. म्हणूनच तर आता उरलेल्या पोळ्यांपासून ही एक चटकदार रेसिपी (How to make tasty bhel from stale chapati ) करून बघा. भेळ सगळ्यांनाच आवडते. आता फक्त भेळ तयार करताना मुरमुरे, फरसाण असे टिपिकल भेळीचे पदार्थ न टाकता उरलेल्या पोळ्या वापरा आणि चटपटीत, कुरकुरीत भेळ करा. (Best recipe from baasi roti)
ही भेळ आपण पोळ्यांपासून करत आहोत. त्यामुळे ती अर्थातच पौष्टिकही आहे. त्यामुळे ही भेळ तुम्ही सायंकाळच्या चहासोबत काहीतरी स्नॅक्स म्हणून करू शकता. मुलांना नेहमीच काहीतरी टेस्टी आणि यम्मी खायचं असतं. आपले तेच ते पदार्थ त्यांना मुळीच नको असतात, मग अशावेळी ही भेळ तुम्ही त्यांना देऊ शकता. आजकाल मुलांना शाळेत ब्रेकफास्ट आणि लंच असे दोन टिफिन असतात. ब्रेकफास्टच्या डब्यातही कधीकधी अशी भेळ देण्यास हरकत नाही. चटपटीत भेळीची ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या agarnishbowl या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
भेळ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
२ पोळ्या, चवीनुसार तिखट- मीठ, अर्धा चमचा तेल, अर्धी वाटी चिप्स किंवा फरसाण, १ टेबलस्पून चिंचेची आंबट- गोड चटणी, १ टेबलस्पून पुदिना चटणी, शेव, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी दोन- दोन टेबलस्पून.
Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिन स्पेशल तिरंगा रेसिपी! तीन रंगांचे खास पदार्थ, तुम्ही काय स्पेशल करणार?
भेळ रेसिपी
- पोळीचा रोल तयार करा आणि त्यानंतर तिचे छोटे छोटे काप करा.
- एका कढईत तेल टाका. त्यात पोळीचे तुकडे टाकून फ्राय करून घ्या. तेल खूप जास्त वापरायचं नाही.
- पोळी थोडी कडक झाली की त्यात चवीनुसार तिखट- मीठ टाका.
- गॅस बंद करून गरम तव्यावर काही वेळ पोळीचे तुकडे राहू द्या. जेणेकरून त्यांचा कुरकुरीतपणा आणखी वाढेल.
- थंड झाल्यावर फ्राय केलेले पोळीचे तुकडे एका बाऊलमध्ये काढा. त्यात तिखट चटणी, गोड चटणी, थोडेसे विकतचे चिप्स किंवा मग फरसाण, कांदा- टोमॅटो टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. वरतून बारीक शेव आणि कोथिंबीर टाका.
- आंबट- गोड- तिखट चवीची खमंग चटपटीत भेळ तयार.