Lokmat Sakhi >Food > १ वाटी भाजलेल्या चण्यांना द्या चटपटीत ट्विस्ट, प्रोटीन हवे तर करा स्वस्तात मस्त चमचमीत नाश्ता अगदी झटपट...

१ वाटी भाजलेल्या चण्यांना द्या चटपटीत ट्विस्ट, प्रोटीन हवे तर करा स्वस्तात मस्त चमचमीत नाश्ता अगदी झटपट...

How To Make Spicy & Healthy Roasted Chana Chaat Recipe At Home : गरमागरम चहा - कॉफी सोबत खाल्ल्या जाणाऱ्या चण्यांना आपण थोडा ट्विस्ट देऊन चटपटीत-मसालेदार रोस्टेड चणा चाट देखील बनवू शकतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2023 06:47 PM2023-10-09T18:47:10+5:302023-10-09T18:48:03+5:30

How To Make Spicy & Healthy Roasted Chana Chaat Recipe At Home : गरमागरम चहा - कॉफी सोबत खाल्ल्या जाणाऱ्या चण्यांना आपण थोडा ट्विस्ट देऊन चटपटीत-मसालेदार रोस्टेड चणा चाट देखील बनवू शकतो...

Best roasted chana chaat recipe, Healthy Roasted Chana Chaat Recipe, How to make chana chatpata | १ वाटी भाजलेल्या चण्यांना द्या चटपटीत ट्विस्ट, प्रोटीन हवे तर करा स्वस्तात मस्त चमचमीत नाश्ता अगदी झटपट...

१ वाटी भाजलेल्या चण्यांना द्या चटपटीत ट्विस्ट, प्रोटीन हवे तर करा स्वस्तात मस्त चमचमीत नाश्ता अगदी झटपट...

दुपारच्या जेवणात आपण कितीही पोटभर जेवलो तरीही संध्याकाळच्या वेळी छोटी भूक ही लागतेच. या छोट्या भुकेच्या वेळी आपण काहीतरी हलके - फुलके पण पोटभरीचे स्नॅक्स खातो. दुपारी झालेले जेवण आणि रात्रीचे जेवण या दोघांच्या मधली ही छोटी भूक भागवण्यासाठी स्नॅक्स हा उत्तम पर्याय ठरतो. काहीजण या छोट्या भुकेसाठी वेफर्स, शेव, चिवडा फरसाण, बिस्किट्स, नमकीन असे कुरकुरीत, चटपटीत खाणे पसंत करतात. काहीजणांना संध्याकाळच्या नाश्त्याला हेल्दी म्हणून भाजलेले चणे - शेंगदाणे देखील खायला फार आवडतात. गरमागरम चहा - कॉफी सोबत खाल्ल्या जाणाऱ्या या रोजच्या चण्यांना आपण थोडा ट्विस्ट देऊन चटपटीत, मसालेदार चणा चाट (Roasted Chana Chaat Recipe - Healthy Snacks Recipes) देखील बनवू शकतो (Healthy Roasted Chana Chaat Recipe, 2 min Snack Recipe, full of protin).

तोंडाला पाणी आणणारी ही चटपटीत रोस्टेड चणा चाट रेसिपी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहा किंवा कॉफीसोबत एक उत्तम पर्याय होऊ शकतो. भाजलेले चणे खाल्ल्याने आरोग्याला (Healthy & quick snacks for weight loss/Roasted Chana chaat) अनेक फायदे मिळतात. असे असले तरीही, चणे हे फक्त चवीपुरते किंवा भूक भागवण्यासाठी मर्यादित नसून, आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. भाजलेल्या चण्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन वाढत नाही. तसेच यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, फायबर आणि व्हिटामिन असते. ज्यामुळे शरीराला काम करण्याची उर्जा तर मिळतेच, सोबत अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा मिळतात. अशा या आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या चण्यांना मसालेदार ट्विस्ट देऊन चटकन चणा चाट (Spicy And Healthy Roasted Chana Chaat) बनवू शकतो. रोस्टेड चणा चाट बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Roasted chana chaat Recipe).

साहित्य :- 

१. भाजलेले चणे - १/२ कप 
२. कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला)
३. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)
४. टोमॅटो - १/२ कप (बारीक चिरलेला)
५. चाट मसाला - चवीनुसार 
६. लाल जाडी शेव - १/२ कप 
७. जिरेपूड - चवीनुसार 
८. लाल तिखट मसाला - चवीनुसार 
९. मीठ - चवीनुसार 
१०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
११. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

गाजर न किसता अगदी १० मिनिटांत करा टेस्टी झटपट गाजर हलवा, जिभेवर ठेवताच अलगद विरघळेल असा स्वाद...

मेथीची भाजी, पराठे तर रोजच खातो, अस्सल गावरान ठसक्याच्या मेथी झुणक्याची सोपी रेसिपी...चव चाखून तर पहा...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये भाजलेले चणे सालीसकट किंवा आपल्या आवडीनुसार साल काढून घ्यावेत. 

मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी...

वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...

२. आता या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लाल जाडी शेव घालून घ्यावी. 
३. त्यानंतर त्यावर आपल्या आवडीनुसार चाट मसाला, जिरेपूड, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस व वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. 

आपले चटपटीत चणा चाट खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Best roasted chana chaat recipe, Healthy Roasted Chana Chaat Recipe, How to make chana chatpata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.