हिवाळ्यात बाजारांमध्ये ताजे, आंबटगोड चवीचे फ्रेश आवळे विकायला ठेवलेले असतात. आवळा आपल्या बहुगुणी गुणधर्मासाठी ओळखला जातो. आवळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तज्ज्ञ हिवाळ्यात आवळा खाण्याचा सल्ला देतात. फार पूर्वीपासून आवळ्याचा उपयोग अनेक आजार बरे करण्यासाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी केला जातो. हिवाळ्यात या व्हिटॅमिन-'सी' समृद्ध आवळ्याचे अनेक पदार्थ प्रत्येकाच्याच घरी तयार केले जातात. आवळ्याचं लोणचं, मुरांबा, कँडी, ज्यूस अशा वेगवेगळ्या रुपात खाल्ला जातो. पण आवळ्यातील अनेक चांगले गुणधर्म आपल्या शरीराला मिळावेत यासाठी आवळा खाण्याची एक योग्य पद्धत असते(best way to eat amla for amazing health benefits).
आवळ्याला हिवाळ्यातील सुपरफूड मानले जाते, कारण याने इम्यूनिटी बूस्ट होऊन वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच आवळ्याने वजन कमी करण्यास, केस आणि त्वचेसंबंधी समस्याही दूर होतात. आयुर्वेदात आवळ्याला (One Smart way to include Amla in your winter diet) खूप महत्वं आहे. पण अनेकांना आवळा खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. आयुर्वेद Dr. Nambi Namboodiri यांनी आवळ्या खाण्याची योग्य पद्धत त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. आवळ्यातील अनेक चांगले गुणधर्म आपल्या शरीराला मिळावेत यासाठी आवळा खाण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूयात(Best way to include amla in your diet to increase the immunity during winters).
आवळा खाण्याची योग्य पद्धत...
आयुर्वेदात एकूण ६ रस आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आवळ्यामध्ये खारट सोडून बाकी सगळे रस असतात. त्यामुळे आवळा खाताना तो नेहमी मिठासोबतच खावा. मिठासोबत आवळा खाल्ल्याने तो परिपूर्ण बनतो आणि त्याचा आंबटपणाही बॅलन्स होतो. तसेच मिठासोबत आवळा खाल्ल्याने आपल्या आरोग्यास त्याचे अधिक फायदेही मिळतात.
डॉक्टरांनी सांगितलं की, आवळ्यामध्ये दोन मुख्य गुण असतात. त्याना धात्री आणि रसायनी म्हटलं जातं. धात्रीचा अर्थ आईसारखी रक्षा करणं आणि रसायनी म्हणजे पोषण देणे. म्हणजे आवळा शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव तर करतोच, सोबतच पोषणही देतो.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आपण आवळा वर्षभर स्टोअर करून देखील खाऊ शकतो. आवळा शरीरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखण्यास खूप मदत करतो. एका काचेच्या बरणीत वर्षभर पुरेल आता आवळा घेऊन त्यात मीठ घालून तो स्टोअर करून ठेवा आणि रोज त्यातील एक आवळा खा.
भाग्यश्री सांगते हिवाळ्यात शिंगाडा खाण्याच्या ३ पद्धती, आहारात असायलाचं हवं असं पौष्टिक फळं...
अनेकांना प्रश्न पडतो की, कोणत्या प्रकारचे आवळे खाण्यासाठी अधिक चांगले असतात. बाजारात दोन प्रकारचे आवळे मिळतात एक म्हणजे छोट्या आकाराचे आणि दुसरे मोठ्या आकाराचे. एक्सपर्टनुसार, गावराणी आवळे खावेत जे आकाराने लहान असतात. मोठा आकाराचे आणि स्वच्छ दिसणारे आवळे हायब्रिड असतात. ते खाऊ नये.
मिठाप्रमाणेच आपण आवळा मधासोबत देखील खाऊ शकता. मधासोबत आवळा खाणे आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहे. मात्र आवळा मीठाशिवाय अपूर्णच आहे. जर तुम्हाला आवळा त्याच्या अधिक चांगल्या फायद्यांसाठी खायचा असेल तर त्यात लाल तिखट मसाला, तेल कधीही घालू नका किंवा लोणचे बनवल्यानंतर आवळा खाऊ नका.