Lokmat Sakhi >Food > आल्याची सालं काढण्याचं किचकट काम होईल सोपं; 3 ट्रिक्स, 2 मिनिटांत सोलून होईल आलं

आल्याची सालं काढण्याचं किचकट काम होईल सोपं; 3 ट्रिक्स, 2 मिनिटांत सोलून होईल आलं

Best Way to Peel Ginger : अच्च आलं चावून खाल्ल्यानं सर्दी, खोकला, पोटदुखी, हाय कोलेस्टेरॉल, मायग्रेन, हाय ब्लड प्रेशरपासून आराम मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 01:02 PM2023-07-02T13:02:10+5:302023-07-02T19:51:09+5:30

Best Way to Peel Ginger : अच्च आलं चावून खाल्ल्यानं सर्दी, खोकला, पोटदुखी, हाय कोलेस्टेरॉल, मायग्रेन, हाय ब्लड प्रेशरपासून आराम मिळतो.

Best Way to Peel Ginger : How to peel ginger with 3 easy tricks kitchen hacks | आल्याची सालं काढण्याचं किचकट काम होईल सोपं; 3 ट्रिक्स, 2 मिनिटांत सोलून होईल आलं

आल्याची सालं काढण्याचं किचकट काम होईल सोपं; 3 ट्रिक्स, 2 मिनिटांत सोलून होईल आलं

सर्वांच्याच घरी रोजच्या जेवणात आल्याचा वापर केला जातो. आल्याशिवाय भाजीला चव येत नाही. पावसाळ्यात आलं घातलेला चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते. आल्याचा चहा प्यायल्यानं सर्दी, कफ, खोकल्यापासूही आराम मिळतो. यात व्हिटामीन ए, व्हिटामीन डी, आयर्न, जिंक यांसारखे न्युट्रिएंट्स असतात. (Best Way to Peel Ginger) जे शरीराला वेगवेगळे फायदे देतात. अच्च आलं चावून खाल्ल्यानं सर्दी, खोकला, पोटदुखी, हाय कोलेस्टेरॉल, मायग्रेन, हाय ब्लड प्रेशरपासून आराम मिळतो. (How to peel ginger with 3 easy tricks kitchen hacks)

आलं कसं सोलायचं?

आलं खाद्यपदार्थांमध्ये वापरल्याने बरेच फायदे मिळतात. पण आल्याचा वाकड्या-तिकड्या आकारामुळे आलं सोलणं कठीण होतं. आलं सोलणं किचकट वाटतं. आलं सोलण्याच्या काही ट्रिक्स तुमचं किचनचं काम अधिक सोपं करू शकतात.

काहीवेळ आधी फ्रिजमधून काढून ठेवा

आल्याचा वापर थोड्या थोड्या प्रमाणात केला जातो. म्हणूनच आलं जास्तवेळ फ्रिजमध्ये ठेवलं जातं आणि गरज भासल्यास बाहेर काढलं जातं. यामुळे आल्याची सालं सुकू लागतात. जेव्हा तुम्हाला आल्याचं साल सुकलंय असं वाटेल तेव्हा जवळपास १५ मिनिटं आधी आलं रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढून ठेवा. जेव्हा आल्याचं तापमान नॉर्मल होईल तेव्हा सुरीच्या मदतीनं सहज आल्याचं साल काढू शकता. 

पोट सुटलंय, खाणं कमी केलं तरी वजन घटत नाही? ४ चुका टाळा, लवकर स्लिम-फिट दिसाल

चमच्याचा वापर करा

अनेकदा आल्याची सालं चाकूनं किंवा सुरीनं काढणं कठीण होतं. अशावेळी तुम्ही चमच्याच्या मदत घेऊ शकता. पातळ आणि धारदार चमच्यानं सालं काढल्यानं तुमचं काम अधिक सोपं होईल आणि जास्तवेळही लागणारही नाही.

शरीरात रक्त कमी झालं? हिमोग्लोबीन वाढवणारे ५ पदार्थ; रोज खा-थकवा घालवा

आल्याचे लहान तुकडे करून घ्या

आल्याचा आकार सरळ, सपाट नसतो. म्हणूनच आलं सोलणं किचकट वाटतं. म्हणूनच आलं सोलण्याआधी लहान लहान तुकड्यांमध्ये कापा. ज्याची साईज १ ते २ इंचाची असायला हवी. आता चमचा, चाकू किंवा फायलरच्या मदतीनं तुम्ही सोप्या पद्धतीनं आलं सोलू शकता.

आल्याचा आहारात समावेश केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. गॅस डायजेशनमध्ये सुधारणा होते याशिवाय रोगप्रतिकारकशकत्ती वाढते, सूज कमी होते, घसा खवखवणं, सर्दीच्या लक्षणांपासूनही आराम मिळतो. आल्याची पेस्ट तुम्ही सर्व भाज्यांमध्ये वापरु शकता. विकत मिळणारी आल्याची पेस्ट वापरण्यापेक्षा घरात ताजे आले वापरून पेस्ट तयार करा.

Web Title: Best Way to Peel Ginger : How to peel ginger with 3 easy tricks kitchen hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.