Join us  

तूप करण्यासाठी साय साठवता? पण त्यातून दुर्गंधी येते, बुरशी लागते? ५ टिप्स, साय टिकेल महिनाभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 4:20 PM

Best ways and tips to store malai to make it last long : साय साठवताना लक्षात ठेवा ५ टिप्स, सायीला बुरशी लागणार नाही, दुर्गंधीही येणार नाही..

लहानपणापासून आपल्याला दूध यासह डेअरी प्रॉडक्ट्स खाण्याची सवय लावण्यात आलेली आहे. डेअरी प्रॉडक्ट्स खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मुख्य म्हणजे दूध पिण्याचे फायदे आपल्याला ठाऊकच असतील. दुधापासून दही, पनीर, श्रीखंड, आणि तूप तयार होते. तूप करण्याची प्रोसेस फार मोठी आहे. घरगुती तूप तयार करण्यासाठी, साधारण १० दिवस आधी त्याची साय साठवून ठेवण्यात येते. त्यानंतर लोणी कडवून त्यातून साजूक रवाळ तूप तयार होते.

अनकेदा साय साठवून ठेवल्यानंतर त्यातून दुर्गंधी येऊ लागते. काही वेळेला सायीवर फंगस देखील तयार होते. त्यामुळे साठवून ठेवलेली सायी खराब होते. साठवलेली साय लवकर खराब होऊ नये यासाठी काय करावे? तूप तयार करण्यासाठी साय कशा पद्धतीने साठवून ठेवायची? साय साठवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्या? पाहा(Best ways and tips to store malai to make it last long).

अधिक वेळ साय साठवून ठेवण्यासाठी टिप्स

- जर तूप तयार करण्यासाठी साय साठवून ठेवत असाल तर, थंड ठिकाणी साठवून ठेवा. साय गरम ठिकाणी साठवून ठेवल्यास त्यात फंगस निर्माण होते. ज्यामुळे सायमधून दुर्गंधी तर येतेच, शिवाय साय चवीला आंबट लागते.

मुठभर शेंगदाण्याची आमटी वाढवेल उपवास फराळाची चव, ' अशी ' करा झणझणीत आमटी

- साय साठवून ठेवताना त्यात थोडे दूध घालत राहा. नंतर चमच्याने मिक्स करा. यामुळे त्यात फंगस निर्माण होणार नाही. किंवा त्यातून दुर्गंधीही येणार नाही.

- आपण साय कोणत्याही भांड्यात साठवून ठेऊ शकता. चिकणमाती, प्लास्टिक, काच आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये साय साठवून ठेवल्यास त्यातून दुर्गंधी येत नाही.

- जर आपल्याकडे फ्रिज नसेल किंवा फ्रिजमध्ये साठवून ठेवायचं नसेल तर, चिकणमातीच्या भांड्यात साठवून ठेवा. मातीच्या भांड्यात साय साठवून ठेवल्यास त्यातून दुर्गंधी येत नाही, व ती लवकर खराबही होत नाही. शिवाय मातीच्या भांड्यात साठवून ठेवलेल्या सायीपासून तूप उत्तम तयार होते.

२ टॉमेटो-कपभर शेंगदाण्याची करा चमचमीत चटणी, डोसा-पराठ्यासोबत लागेल चविष्ट - खा पोटभर

- आपण साय फ्रिजरमध्ये देखील साठवून ठेवू शकता. फ्रिजरमध्ये साय साठवून ठेवल्यास साय लवकर खराब होत नाही. जर आपण फ्रिजरमध्ये साय साठवून ठेवत असाल तर, हवाबंद डब्यात साठवून ठेवा. जेणेकरून वरच्या थरावर बर्फ निर्माण होणार नाही.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स