दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात ठरलेले पदार्थ म्हणजे वरण - भात आणि पोळी भाजी. बऱ्याचदा जेवणानंतर भात - चपात्या उरतात. उरलेल्या चपात्यांचे अनेक पदार्थ बनवून खाता येतात. पण उरलेल्या भाताचं काय करावं हे फारसं कळत नाही. अशावेळी आपण उरलेला भात दुसऱ्या दिवशी तसाच खातो किंवा फार फार तर त्याचा फोडणीचा भात (Bhaat Ka Thepla Recipe) करून खातो. आज जेवणात भात उरला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचा फोडणीचा भात खायचा असं गणित प्रत्येक घरात असतंच. उरलेला भात फेकून देण्यापेक्षा त्यापासून काही टेस्टी अन्नपदार्थ बनवले तर ते आवडीने खाल्ले जातात(Rice Thepla Recipe).
उरलेल्या भातापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाताच्या रेसिपी बनवू शकता. व्हेजिटेबल पुलाव, लेमन राईस, दही भातमी भाताची खीर, फ्राईड राईस असे अनेक पदार्थ भातापासून बनवता येतात. पण तुम्ही कधी उरलेल्या भाताचे थेपले बनवले आहेत का ? उरलेल्या भातापासून तेच ते भाताचे अनेक प्रकार बनवण्यापेक्षा काहीतरी नवीन ट्राय करता येऊ शकत. उरलेल्या भाताचे थेपले कसे बनवावे याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Leftover Rice Thepla At Home).
साहित्य :-
१. उरलेला भात - २ कप २. दही - २ टेबलस्पून ३. गव्हाचे पीठ - १ कप ४. हळद - १/२ टेबलस्पून ५. मीठ - चवीनुसार ६. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ७. धणे पूड - १ टेबलस्पून ८. ओवा - १ टेबलस्पून ९. तेल - गरजेनुसार १०. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)११. मैदा - १ टेबलस्पून (पर्यायी)
लाटताना चपाती पोळपाट किंवा लाटण्याला चिकटू नये म्हणून सोप्या ६ टिप्स, करा परफेक्ट गोल चपाती...
वाटीभर सुक्या खोबऱ्याची करा झणझणीत चटणी, तोंडी लावण्यासाठी म्हणून परफेक्ट...
कृती :-
१. एका मोठ्या परातीमध्ये उरलेला शिळा भात घेऊन त्यात दही घालूंन हा भात हलक्या हाताने किंचित कुस्करून घ्या. २. दही पूर्णपणे भातात मुरलं पाहिजे असे व्यवस्थित एकजीव करुन घ्यावे. ३. आता या मिश्रणात गव्हाचे पीठ, मैदा (पर्यायी), हळद, लाल तिखट मसाला, धणे पूड, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल घालावे.
फणसाचे गरे पोटाला बरे, म्हणूनच खा फणसाचे कुरकुरीत वेफर्स - कोकणी पद्धतीची पारंपरिक रेसिपी...
४. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालत हे पीठ कणकेप्रमाणेच मळून घ्यावे. ५. आता या तयार पिठाचे लहान लहान गोळे करून त्याचे छोटे गोलाकार थेपले लाटून घ्यावेत. ६. गरम तव्यावर तेल सोडून हे थेपले दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत.
उरलेल्या भाताचे गरमागरम थेपले चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.