इतर ऋतुंपेक्षा हिवाळ्यात फळं आणि भाजीपाला अगदी फ्रेश आणि ताजा मिळतो. अशी फ्रेश फळं, भाजीपाला खाणे आरोग्यासाठी अधिक चांगले आणि फायदेशीर असते. असं म्हणतात प्रत्येक ऋतूत येणारी फळं आणि भाजीपाला यांचा आवर्जून आहारात समावेश करायला हवा. थंडीच्या दिवसात बाजारांत पेरु, सीताफळ, सफरचंद, डाळिंब, शिंगाडे अशी फळं फार मोठ्या प्रमाणावर विकायला असतात. हिवाळ्यात शिंगाडे (Water Chestnut) खाणं इतर हंगामी फळांप्रमाणेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री सध्या ती इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असते आणि तिचं फॅन फाॅलोईंगही जबरदस्त आहे. एवढंच नाही तर तिच्या चाहत्यांसाठी ती काही हेल्थ टिप्ससुद्धा देत असते(Surprising Benefits of Water Chestnuts).
भाग्यश्रीने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत हिवाळ्यात शिंगाड्याचे फळं खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते सांगितले आहे. तिने शिंगाड्याचे फळं खाण्याचे फायदे सांगतानाचा हा व्हिडिओ खूपच कमी वेळात चांगलाच व्हायरल झाला आहे. हिवाळ्यात आपल्या रोजच्या डाएटमध्ये शिंगाड्याच्या फळांचा समावेश करण्याच्या तीन पद्धती तिने शेअर केल्या आहेत. नेमक्या कोणत्या तीन पद्धतींनी शिंगाड्याच्या फळाचा आहारात समावेश करावा ते पाहूयात(Bhagyashree Shares The Health Benefits Of Water Chestnuts, 3 Ways To Include It In Your Diet).
हिवाळ्यात शिंगाड्याचे फळं खाण्याचे फायदे...
खरं तर शिंगाडा ही पाण्यातील एक भाजी आहे. पाण्यामध्ये उगवणारी ही फळभाजी कुरकुरीत आणि चवीला गोड लागते. शिंगाड्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. या शिंगाड्यामध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण भरपूर असते. शिंगाडा हे असं फळ आहे जे खूप आवडीने खाल्लं जातं. हे फळ खाण्यास चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे फळ कच्चं किंवा उकडून खाल्लं जातं. हे फळ शरीराला अनेक गंभीर विकारांपासून वाचवते.
शिंगाड्यामध्ये ७४% पाण्याचे प्रमाण असते. शिंगाड्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही या फळाचे सेवन अवश्य करु शकता. या फळामुळे आपले पोट लवकर भरते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. अनेकांना फळं खाल्ल्यामुळं रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती वाटते. मात्र, शिंगाड्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेही रुग्णही याचं सेवन सहज करू शकतात. शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यामुळे दातांच्या आणि हाडांच्या मजबुतीसाठी शिंगाडा खाणे फायदेशीर ठरते. शिंगाडे आपल्या शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून कार्य करते. तसेच आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. यामुळे तुमचे शरीर आतून निरोगी राहते. तुमची त्वचा आणि केस देखील चमकदार आणि निरोगी दिसतात.
हिंदी सिनेमात गाजलेले ‘मुली के पराठे’ हिवाळ्यात तर खायलाच हवे, पाहा सोपी आणि पौष्टिक रेसिपी...
हिवाळ्यात आहारात शिंगाडा हवाच, वाचा शिंगाडा खाण्याचे ६ पौष्टिक फायदे....
भाग्यश्री सांगते शिंगाड्याचे फळं खाण्याच्या तीन पद्धती..
१. कच्चे किंवा उकडून खा :- शिंगाड्याचे फळं पाण्याने धुवून आधी चांगले स्वच्छ करा. त्यानंतर त्याची साल काढून टाका. आता पाण्यात उकडवून किंवा कच्चे अशा दोन्ही स्वरूपात आपण हे फळं खाऊ शकता.
२. सॅलॅड म्हणून खा :- उकडवून घेतलेले किंवा कच्च्या शिंगाड्याचे बारीक तुकडे करा. आता गाजर, कोबी, लेट्युसची पान यांसारख्या भाज्यांमध्ये मिक्स करून आपण सॅलॅड म्हणून देखील शिंगाडा खाऊ शकतो.
३. भाज्यांमध्ये मिक्स करुन खा :- शिंगाड्याचे फळ आपण भाजी म्हणून देखील खाऊ शकतो. यासाठी गवार, फरसबी, किंवा टोफू यांसारख्या भाज्यांमध्ये मिक्स करून आपण शिंगाडा खाऊ शकता.