Join us  

Bhakarwadi Recipe : नाश्त्याला घरीच करा कुरकुरीत खमंग बाकरवडी; 'ही' घ्या झटपट होणारी स्वादिष्ट, चटपटीत रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 4:53 PM

Bhakarwadi Recipe : जवळपास महिनाभर तुम्ही भाकरवडी साठवून ठेवून शकता. रोज, सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला भाकरवडीचा आनंद घेऊ शकता.

स्नॅक्स खाण्याचा शौक जवळपास सगळ्यांनाच असतो.  बहुतेकांना संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत पदार्थ खायला आवडतात. बाहेरचं नेहमी नेहमी खाल्यानं आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पण जर तुम्ही घरीच खमंग, चटपटीत पदार्थ बनवले तर रोज नाश्त्याला खाता येतील. (Easy Cooking Tips) बाकरवडीची सोपी, झटपट रेसेपी तुम्हाला सांगणार आहोत. बनवायला सोपी खायला खमंग बाकरवडी चहा बरोबर खाण्याची मजाच वेगळी. बाकरवडी हा गुजरातमधील सर्वात लोकप्रिय नाश्ता आहे.  महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी वेगवेगळी खासियत  असलेल्या बाकरवडी मिळतात. (How to Make Bhakarvadi)

बाकरवडीच्या आवरणासाठी:

100 ग्राम मैदा, 2 चमचे बेसन, 1 चमचा गरम तेलाचं मोहन, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट २ चमचे ओवा

सारणासाठी :

1 चमचा जिरं, 1 चमचा पांढरे तीळ, 4 चमचे खोबरं, 2 चमचे  कोथिंबीर, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ,  4 चमचे शेव, 1 चमचा साखर, 2 चमचे चिंच गुळाची चटणी

कृती

सगळ्यात आधी एका भांड्यात मैदा, बेसन, लाल तिखट, मीठ, ओवा आणि तेलाचं मोहन घालून पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. त्यांनतर एका कढईत जिरं, तीळ, सुक खोबरं, आणि कोथिंबीर परतून मिक्सर मधून वाटून घ्या. 

एकत्र केलेल्या मिश्रणात लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, मीठ, साखर, शेव टाकून परत वाटण वाटून घ्या.

मळलेल्या पिठाची पारी लाटून घ्या. त्यावर चिंच गुळाची चटणी लावावी. या पारीवर सारण आणि शेव घाला. त्याचा रोल बनवून घ्या. नंतर जास्त जोर न लावता काप करून घ्या. नंतर ५-७ मिनिटं तळून घ्या.

लालसर झाल्यानंतर बाकरवड्या बाहेर काढून घ्या. जवळपास महिनाभर तुम्ही भाकरवडी साठवून ठेवून शकता. रोज, सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला भाकरवडीचा आनंद घेऊ शकता.

1)

2)

3)  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स