Join us  

गुजराथी मसाला भाकरीची सोपी रेसिपी, चवीला भारी-करा खरपूस भाकरी झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2023 1:03 PM

Bhakri Recipe for Breakfast | Gujarati Recipes भाकरी आवडत असेल तर ही मसाला भाकरीही करुन पाहा, लाटूनही करता येते अशी सोपी कृती

'अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर'.. हे गाणं आपण ऐकलंच असेल. संसारात २ वेळच्या जेवणापैकी एका वेळच्या जेवणात भाकरी असतेच. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये भाजी, डाळ, चटणी यांसोबत खाण्यासाठी चपाती किंवा भाकरी दिली जाते.

साधारणतः भाकरी ज्वारी किंवा बाजरीची केली जाते. जी पचायला हलकी आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. पण अनेकदा भाकरी खाऊन कंटाळा येतो. भाकरीसोबत काही विशेष भाजी खायला नसेल, किंवा हटके काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर, गुजराथी पद्धतीची मसाला भाकरी ही रेसिपी ट्राय करून पाहा. ही भाकरी आपण अशीच देखील खाऊ शकता, किंवा ताकाच्या कढीसोबत देखील अप्रतिम लागते(Bhakri Recipe for Breakfast | Gujarati Recipes).

मसाला भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य

ज्वारीचे पीठ

रवा

हळद

लाल तिखट

धणे पूड

जिरं पावडर

ओवा

करा बटाट्याचा रस्सा, म्हणाल अशी गावरान ठसक्याची झणझणीत भाजी कधी खाल्ली नव्हती!

चवीनुसार मीठ

कोथिंबीर

तूप

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या प्लेट अथवा परातीत एक कप ज्वारीचे पीठ घ्या, त्यात एक कप रवा, एक टेबलस्पून हळद, एक टेबलस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून धणे पूड, एक टेबलस्पून जिरं पावडर, ओवा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि एक टेबलस्पून तूप घालून पिठात साहित्य मिक्स करा.

घरी ढाबास्टाईल डाळ - खिचडी करता येत नाही? कुकरमध्ये द्या फोडणी, ढाब्यावरची चव येईल नक्की

यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्या. दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. जर आपल्याला भाकरी थापायला जमत नसेल तर, लहान आकाराची भाकरी लाटून तयार करा. व तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूने भाकरी खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे मसाला भाकरी खाण्यासाठी रेडी. आपण ही भाकरी ताकाच्या कढीसोबत अथवा लोणचे, किंवा झणझणीत भाजीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स