Join us

भारती सिंग मुलासाठी करते हेल्दी ड्रायफ्रुट्स चॉकलेट्स, कमी खर्चात होणारी हेल्दी-पौष्टीक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2025 19:05 IST

healthy dry fruit chocolate recipe for kids: Bharti Singh viral chocolate recipe: ड्रायफ्रुट्सचे हेल्दी आणि पौष्टिक चॉकलेट घरी कसे तयार करायचे पाहूया.

चॉकलेट हा पदार्थ सगळ्यांच आवडतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण आवडीने चॉकलेट खातात.(kids friendly chocolate without sugar) लहान मुलांचा आवडता गोड पदार्थ चॉकलेट. ते खाण्यासाठी अगदी पालकांकडे ते हट्ट करतात, रडून रडून हैराण करतात.(Homemade chocolate recipe) परंतु, वारंवार मुलांना चॉकलेट खाऊ घातले तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. (Bharti Singh viral chocolate recipe)अतिप्रमाणात मुलांनी चॉकलेट खाल्ले तर दात किडतात.(homemade chocolate energy bites) तसेच पोटाचे दुखणे देखील वाढते. यात असणारे कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्यास वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.(dry fruits sweets recipe for kids) डॉक्टर देखील मुलांना जास्त प्रमाणात चॉकलेट न खाण्याचा सल्ला देतात. परंतु मुले काही केल्या ऐकत नाहीत. अशावेळी नेमकं काय करावं आपल्यालाही समजत नाही.(healthy snacks for kids under 5)

हॉटेलातल्या एकाचएक चवीपेक्षा भारी चमचमीत मऊ पनीरच्या भाज्या करा घरीच, ४ ट्रिक्स- पनीर पसंद.. याच प्रकारचा अनुभव सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगला आपल्या मुलाबद्दल आला. मुलांसाठी काही हेल्दी आणि पौष्टिक बनवायचे असल्यास आपण हे चॉकलेट ट्राय करु शकतो. यात असणारे घटक मुलांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. ड्रायफ्रुट्सचे हेल्दी आणि पौष्टिक चॉकलेट घरी कसे तयार करायचे पाहूया. 

साहित्य 

चॉकलेट - १ कपबदाम - १ कप मखाणे - १ कपकाजू - १ कप बेदाणे - १ कप खजूर - १ कप (बिया काढलेले)

कृती 

1. सगळ्यात आधी चॉकलेट वितळवून घेऊन बाजूला ठेवा. 

2. आता कढईमध्ये बदाम, मखाणे आणि काजू चांगले लालसर होईपर्यंत भाजा.

3. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स घालून मिश्रण वाटून घ्या. आता त्यात बेदाणे आणि खजूर घालून पुन्हा एकदा वाटून घ्या. 

4. त्यानंतर वाटलेले ड्रायफ्रुट्स मोल्डमध्ये घेऊन चांदले सेट करा. सेट झाल्यानंतर वितळवलेल्या चॉकलेटमध्ये बुडवून घ्या. 

5. ५ ते ६ तास फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवा. तयार होईल हेल्दी ड्रायफ्रुट्स चॉकलेट्स अगदी घरच्या घरी. मुले देखील आवडीने खातील. 

 

टॅग्स :अन्नपाककृती