'चॉकलेट' लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे असते. चॉकलेट खायला कुणाला आवडणार नाही. लहान मुलं तर पालकांकडे चॉकलेट पाहिजेच म्हणून अनेकवेळा (Bharti Singh's Healthy Dry Fruit Chocolate Recipe) हट्ट करतात. काहीवेळा आपण मोठ्या हौसेने देखील मुलांना चॉकलेट ( Bharti Singh's Viral Healthy Chocolate Recipe) खाऊ देतो. परंतु वारंवार असे चॉकलेट खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. यासाठी आपण मुलांना चॉकलेट न खाण्याचा किंवा कमी खाण्याचा सल्ला देतो. परंतु मुलं काही केल्या ऐकत नाहीत. अशावेळी नेमकं काय करायचं हे समजत नाही(Healthy Homemade Chocolates Recipe For Children).
असाच अनुभव सुप्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती सिंग हिला देखील आला. यावर भारती सिंगने एका हेल्दी होममेड चॉकलेट्सची रेसिपी शेअर करत, मुलांसाठी चॉकलेटला पर्याय म्हणून हेल्दी चॉकलेट तयार केले. अशावेळी आपण मुलांसाठी हेल्दी व पौष्टीक होममेड ड्रायफ्रुटस चॉकलेट्स घरच्याघरीच तयार करून देऊ शकतो. भारती नेहमीच आपल्या मुलासाठी काहीतरी हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ करत असते, आणि त्याच्या रेसिपी इनस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत असते. मुलांना चॉकलेट आवडते म्हणून आपण त्यांना ड्रायफ्रुटसचे हेल्दी आणि पौष्टिक असे चॉकलेट घरच्याघरीच कसे तयार करून देऊ शकतो, याची रेसिपी तिने नुकतीच शेअर केली आहे(Bharti Singh's Viral Recipe).
साहित्य :-
१. बदाम - १ कप २. मखाणे - १ कप ३. काजू - १ कप ४. मनुका - १/२ कप ५. खजूर - १ कप (बिया काढून घेतलेले) ६. मेल्टेड चॉकलेट - १ कप
फक्त १ मिनिटांत काजू-बदामाचे सुंदर काप करणारं हे घ्या यंत्र, फक्त ६० रुपयांत...
मेदू वडा उरला ? मग करा चमचमीत चवीचा 'मेदू वडा बर्गर', करायला सोपा खायला चटपटीत असा पदार्थ...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एक पॅन घेऊन त्यात बदाम, मखाणे, काजू तिन्ही एकत्रित घालून कोरडे भाजून घ्यावेत. २. बदाम, मखाणे, काजू कोरडे भाजून झाल्यावर ते थोडे थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यावेत. ३. बदाम, मखाणे, काजू थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओतून मिक्सर फिरवून त्याची थोडी जाडसर अशी भरड तयार करून घ्यावी. ४. मिक्सरमधील या ड्रायफ्रुट्सच्या तयार जाडसर पावडरमध्ये बिया काढून घेतलेले खजूर आणि मनुका घालून घ्याव्यात. ५. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सर फिरवून सगळे जिन्नस एकत्रित वाटून त्याची भरड तयार करून घ्यावी.
आता कढई -झारा विसरा, तळण्यासाठी फक्त ५०० रुपयांचं भांडं, कमीत तेलात होते तळण...
६. आता एक बर्फाचा ट्रे किंवा सिलिकॉन चॉकलेट मोल्ड्स घेऊन त्यात हे तयार मिश्रण दाबून भरून घ्यावे. मग हा ट्रे ३ ते ५ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून चॉकलेट व्यवस्थित सेट करून घ्यावे. ७. ५ तासानंतर हे चॉकलेट फ्रिजमधून काढून मेल्टेड चॉकलेटमध्ये बुडवून व्यवस्थित चारही बाजूने कोट करून घ्यावे. ८. मेल्टेड चॉकलेटने कोट केल्यानंतर ते पुन्हा सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये २ तासांसाठी ठेवून द्यावे.
हेल्दी ड्रायफ्रूट्स चॉकलेट खाण्यासाठी तयार आहे. आपण हे चॉकलेट फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.