भेंडीची भाजी म्हटलं की लहान मूलं नाक मुरडतात. तर काही मोठ्या माणसांनाही ही भाजी आवडत नाही. भेंडीची भाजीची चव कशी लागणार हे तुम्ही कोणत्या पद्धतीने भेंडी बनवणार यावर अवलंबून असते. भेंडी धुण्यापासून कढईत घालेपर्यंत अनेक लहान-सहान कामं परफेक्ट करावी लागतात. (Bharwa Bhindi (Stuffed Okra) Recipe) तेव्हाच भेंडीची भाजी, चवदार बनते. साध्या फोडणीची भेंडीची भाजी खायला अनेकांना नकोशी वाटते. तुम्ही भरली भेंडी घरच्याघरी एकदम परफेक्ट बनवू शकता. भरली भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Stuffed Bhindi)
साहित्य
भेंडी- पाव किलो
शेंगदाणे - २ वाटी
लसूण- ६ ते ७
हळद- १ चमचा
धणे पावडर - १ चमचा
लाल तिखट- २ चमचे
गरम मसाला- १ चमचा
आमसूल पावडर- १ चमचा
तीळ- ३ ते ४ चमचे
मीठ - चवीनुसार
तेल - गरजेनुसार
कृती
1) भरली भेंडी बनवण्यसाठी सगळ्यात आधी एक मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, तीळ, लसूण, मिरच्या आणि हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, आमसूल पावडर, मीठ मिसळा. या मिश्रणाची बारीक पावडर तयार करून घ्या. यात तेल घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.
तांदुळाच्या पिठीत मिसळा १ गोष्ट, एकही मोदक फुटणार नाही सुबक-कळीदार मोदकांची खास पद्धत
2) भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या. देठ आणि शेवटचे टोक काढून घ्या. भेंडी मधोमध चिरून घ्या. चिरलेल्या भेंडीमध्ये दाण्यांचे मिश्रण भरून व्यवस्थित बंद करा. एका कढईत तेल घालून त्यात त्यात भेंडी फ्राय करून घ्या. १५ ते २० मिनिंट झाकण ठेवून वाफ काढून घ्या. अधून मधून चमच्याने हलवत राहा. जेणेकरून भेंडी खाली चिकटणार नाही, मग गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घाला. तयार आहे गरमागरम भरली भेंडी. ही भेंडीची भाजी सगळेजण आवडीने खातील. भाकरी, चपातीबरोबर खाण्यासाठी हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.
भेंडी चविष्ट होण्यासाठी सोप्या टिप्स
१) भेंडी चिकट होऊ नये यासाठी भेंडीत एक लिंबू पिळून घाला किंवा दही घाला. हा उपाय केल्याने भेंडीचा चिकटपणा दूर होईल आणि चवही वाढेल.
हॉटेलसारखी चविष्ट पनीरची भाजी घरीच करा; सोपी रेसिपी, जास्त मेहनत न घेता झटपट बनेल भाजी
२) तुम्ही साधी भेंडीची भाजी करा, भेंडी फ्राय किंवा भरली भेंडी करा. चिरल्यानंतर कढईत तेल घालून आधी कमी तेलात तळून घ्या. यामुळे भेंडीचा चिकटपणा दूर होईल.
३) भेंडी चिरताना जास्त लहान लहान काप करू नका. यामुळे भेंडी चिकटते.