Lokmat Sakhi >Food > न खाई भोगी..तो सदा रोगी, भोगीची भाजी करण्याची पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी, आजीची हातची चव

न खाई भोगी..तो सदा रोगी, भोगीची भाजी करण्याची पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी, आजीची हातची चव

Bhogichi Bhaji Recipe | Authentic Maharashtrian Vegetable Curry for Bhogi Celebration : पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी करा मुलंही खातील अगदी आनंदाने..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 06:25 PM2024-01-13T18:25:34+5:302024-01-13T18:27:01+5:30

Bhogichi Bhaji Recipe | Authentic Maharashtrian Vegetable Curry for Bhogi Celebration : पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी करा मुलंही खातील अगदी आनंदाने..

Bhogichi Bhaji Recipe | Authentic Maharashtrian Vegetable Curry for Bhogi Celebration | न खाई भोगी..तो सदा रोगी, भोगीची भाजी करण्याची पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी, आजीची हातची चव

न खाई भोगी..तो सदा रोगी, भोगीची भाजी करण्याची पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी, आजीची हातची चव

मकर संक्रांत (Makar Sankrant) हा पौष महिन्यात येणारा शेती संबंधित सण आहे. मकर संक्रांतीनिमित्त आपण तीळगुळ आणि तिळाचे लाडू वाटून इतरांचे तोंड गोड करतो. त्याच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. भोगीनिमित्त महाराष्ट्रातील बहुतांश घरात तीळ लावून बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी हमखास केली जाते. थंडीच्या दिवसात आरोग्याला फायदेशीर ठरणाऱ्या भाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात. भोगीची भाजी करण्याची देखील बऱ्याच पद्धती आहेत. काही जण हिरव्या भाज्यांचा वापर करून चविष्ट झणझणीत भाजी तयार करतात. तर काही जण भाजीमध्ये विशिष्ट मसाल्याचा वापर करून भाजीला नवा ट्विस्ट देतात (Bhogichi Bhaji).

बाजरीच्या भाकरीसोबत भोगीची भाजी खाण्याची मज्जाच न्यारी आहे (Cooking Tips). जर आपल्या गावाकडच्या पद्धतीने भोगीची भाजी तयार करायची असेल तर, एकदा ही रेसिपी ट्राय करून पाहाच(Bhogichi Bhaji Recipe | Authentic Maharashtrian Vegetable Curry for Bhogi Celebration).

भोगीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य(Bhogichi Bhaji kashi karayachi?)

शेंगदाणे

पांढरे तीळ

किसलेलं ओलं खोबरं

जिरं

मोहरी

संक्रातीला केलेले तिळाचे लाडू महिनाभर टिकतील, घ्या कपभर तिळाची सोपी रेसिपी-कडकही होणार नाहीत

तेल

धणे पूड

लाल तिखट

गरम मसाला

बटाटा

हिरवे वाटाणे

हरभरा

पापडी

गाजर

वांगी

शेवग्याच्या शेंगा

बोरं

चिंचेचा कोळ

गुळ

मीठ

कृती

सर्वप्रथम, पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात कपभर शेंगदाणे घालून भाजून घ्या. भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. मग त्यात एक मोठा चमचा पांढरे तीळ आणि किसलेलं ओलं खोबरं घालून भाजून घ्या. भाजलेले पांढरे तीळ आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याचे वाटण तयार करा. दुसरीकडे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं आणि मोहरी घाला. जिरे तडतडल्यानंतर त्यात वाटण घालून चमच्याने ढवळत राहा. पेस्ट परतवून घेतल्यानंतर त्यात एक चमचा गरम मसाला, धणे पूड, लाल तिखट घालून मिक्स करा.

ना गॅस-ना तेल, ५ मिनिटात धुराचा कांदा करण्याची सोपी कृती, तोंडी लावण्यासाठी ताटात हवीच

वाटण भाजून घेतल्यानंतर त्यात एक कप बारीक चिरलेला बटाटा, हिरवे वाटाणे, एक कप हरभरा, पापडी, गाजर घालून मिक्स करा, आणि २ कप पाणी घालून त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर झाकण काढा, मग त्यात वांग्याच्या फोडी, शेवग्याच्या शेंगा आणि बोरं घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा चिंचेचा कोळ, गुळ आणि चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करा. त्यावर ५ ते ७ मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून भाज्या शिजतील. ५ मिनिटानंतर झाकण काढा आणि भाज्या शिजल्या आहेत की नाही हे चेक करा. अशा प्रकारे भोगीची भाजी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Bhogichi Bhaji Recipe | Authentic Maharashtrian Vegetable Curry for Bhogi Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.