सकाळच्या नाश्त्याला नेमका कोणता पदार्थ करावा असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. नाश्त्याला आपण शक्यतो पोहे, शिरा, उपमा, इडली, डोसा असे अनेक पदार्थ करतो. परंतु काहीवेळा नाश्त्याला तेच ते पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो अशावेळी काहीतरी वेगळं खावंसं वाटत. अशावेळी आपण सकाळच्या नाश्त्याला भोपळ्याचे गोड घारगे करु शकतो. भोपळ्याचे घारगे (How to make ghare) हा खवलेला लाल भोपळा, गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून बनवलेला तळणीचा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. या हलक्या गोड पुऱ्या करायला खूप सोप्या असतात आणि इतक्या चविष्ट असतात की त्या लगेच फस्त केल्या जातात(Bhoplyache Gharge).
भोपळ्याचे घारगे स्नॅक म्हणून किंवा लहान मुलांच्या जेवणाच्या डब्यात देता येतात. शक्यतो घरातील अनेकांना लाल भोपळा आवडत नाही. भोपळ्याची भाजी केली तर ही भाजी खाण्यासाठी नाकं मुरडली जातात. यासाठीच आपण भोपळ्याचे गोड घारगे (Maharashtrian Style Sweet Pumpkin Puris) करुन खाऊ शकतो. या निमित्ताने लाल भोपळा देखील खाल्ला जातो तसेच नाश्त्याला काहीतरी वेगळं खाण्याचा आनंद देखील मिळतो(Lal Bhoplyache Gharge Recipe).
साहित्य :-
१. भोपळा - २५० ग्रॅम
२. गूळ - १ कप
३. गव्हाचे पीठ - ३ कप
४. तांदुळाचे पीठ - १ कप
५. खसखस - १ टेबलस्पून
६. तेल - तळण्यासाठी
७. मीठ - चवीनुसार
इडली स्टँड वापरून १० मिनिटांत ढोकळा करण्याची पाहा ट्रिक, विकतचा ढोकळा कायमचा विसराल इतका छान...
पराठा एक चवी अनेक! 'फोर इन वन' पराठ्याची व्हायरल रेसिपी, करायला सोपा चवीला टेस्टी...
कृती :-
१. प्रेशर कुकरची शिटी काढून त्यात बारीक किसून घेतलेला गूळ आणि भोपळ्याचे मध्यम आकाराचे लहान तुकडे घालून ते ५ ते १० मिनिटे कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
२. कुकरमध्ये हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर हे मिश्रण हलकेसे मॅश करुन घ्यावे.
३. आता एका मोठ्या डिशमध्ये गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ, खसखस, चवीनुसार मीठ तसेच भोपळा व गुळाचा तयार केलेला पल्प घालून घ्यावा.
पराठा चमचमीत करण्यासाठी ही घ्या ‘पराठा मसाला मिक्स’ची खास रेसिपी, ‘असा’ पराठा तुम्ही खाल्लाच नसेल..
४. चपातीचे कणीक मळतो तसेच हे सर्व जिन्नस एकत्रित करून कणीक मळून घ्यावे.
५. या मळून घेतलेल्या कणकेचे छोटे गोळे करुन पुरीच्या आकारात गोलाकार लाटून घ्यावे.
६. आता एका कढईत तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करुन घ्यावे. या गरम तेलात लाटून घेतलेले घारगे सोडून ते दोन्ही बाजुंनी हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावेत.
गरमागरम गोड चवीचे भोपळ्याचे घारगे खाण्यासाठी तयार आहेत. भोपळ्याचे घारगे हे स्वादिष्ट असतात पण आपण मसालेदार आंब्याचे लोणचे किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबरही ते खाण्यासाठी सर्व्ह करू शकता .