हिवाळा म्हणजे हिरव्या भाज्यांचा सिझन. थंडीच्या दिवसात मेथी, पालक, मटार अशा विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. या दिवसात भाज्या देखील खायला चविष्ट लागतात. हिवाळ्यात मटार सर्वत्र मिळतात. त्यामुळे घरात बनणाऱ्या प्रत्येक भाजीमध्ये मटार हा असतोच. मटारमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅटेचिन, एपिक्टिन, कॅरोटीनोईड्स आणि अल्फा-कॅरोटीन असतात, ज्याचा फायदा आपल्या त्वचेला होतो. मटारपासून आपण विविध डिश बनवतो. कधी पराठे, कधी भाजी तर कधी भजी. आज आपण बिहारी स्पेशल मटारपासून तयार गोधुली ही रेसिपी पाहुयात.
बिहारी स्पेशल गोधुली या रेसिपीसाठी लागणारं साहित्य
मटार
बटाटे
तेल
जिरं
हिंग
मीठ
हळद
लाल तिखट
धणे पावडर
गरम मसाला
पाणी
कृती
गोधुली ही बिहारी स्पेशल रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मटारला मिक्सरमधून वाटून घ्या. दुसरीकडे कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात बटाट्याचे काप टाकून भाजून घ्या. बटाट्याचे काप भाजून घेतल्यानंतर त्यात जिरं, हिंग, आलं - लसूण - मिरची पेस्ट टाकून मिक्स करा. त्यानंतर ग्राईंड केलेले मटार घालून मिक्स करा.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात थोडे पाणी घाला. त्यानंतर हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, मीठ टाकून सगळं मिश्रण मिक्स करा. त्यात उकडलेले मटार घाला, व झाकण ठेऊन एक वाफ द्या. वाफ दिल्यानंतर त्यात एक उकडलेला बटाटा कुस्करून घाला, फ्राईड बटाट्याचे काप घाला. व मिश्रण चांगले मिक्स करा. त्यानंतर पाणी आणि गरम मसाला टाका. व झाकण ठेऊन एक वाफ द्या. अशा प्रकारे बिहारी स्पेशल मटार गोधुली खाण्यासाठी रेडी. आपण ही रेसिपी चपाती अथवा भातासह खाऊ शकता.