फक्त १० रुपयांचा बिस्कीट पुडा आणून जर झटपट केक करून मुलांना देता येणार असेल, तर आणखी काय हवे.... मुलांसाठी किंवा ख्रिसमसच्या निमित्ताने केक करण्याचा विचार असेल तर यावेळी ही एक एकदम सोपी रेसिपी ट्राय करून पाहाच. (Easiest and Simplest recipe for cake) अगदी कमीतकमी साहित्यात अगदी उत्कृष्ट केक तयार करता येतो (How to make cake in just 10 rupees). तो कसा करायचा ते आता पाहूया.. (Biscuit cake recipe for Christmas)
बिस्कीटचा केक करण्याची रेसिपी
साहित्य
२० ते २५ बिस्कीटे किंवा बाजारात १० रुपयांचा मिळणारा पार्ले बिस्कीट पुडा.
घरीच करा ढाबास्टाईल लसूणी मेथी, चव अशी भारी की सगळेच विचारतील ही खास रेसिपी
अर्धा टिस्पून बेकिंग पावडर
पाव टिस्पून बेकिंग सोडा
२ टेबलस्पून तुमच्या आवडीचा बारीक काप केलेला सुकामेवा
१ टेबलस्पून टुटीफ्रुटी
पाऊण कप दूध
कृती
१. सगळ्यात आधी एक कुकर किंवा कढई घ्या. त्यात जाळी किंवा वाटी ठेवा. कुकरची वायर आणि शिटी काढा आणि त्यात मीठ टाकून ते १० मिनिटांसाठी मध्यम आचेवर प्री हीट करायला ठेवा.
२. तुमच्या आवडीचा कोणताही बिस्कीट पुडा घ्या. बिस्कीटांचे तुकडे करा आणि त्यात कोमट दूध टाका. साधारण अर्धा कप दूध असावे. बिस्कीटे मऊ झाली की सगळे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. त्यात तुकडे राहणार नाहीत, याची काळजी घ्या. बिस्कीटे मिक्सरमधूनही तुम्ही फिरवून घेऊ शकता.
३. बिस्किटे गोड असतात, त्यामुळे पिठी साखर नाही टाकली तरी चालेल. पण टाकायची असेल तर साधारण १ टेबलस्पून एवढी पिठीसाखर टाका. सगळं मिश्रण हलवून घ्या आणि ५ ते ७ मिनिटांसाठी झाकून ठेवा.
४. तोपर्यंत केकचा डबा घ्या. त्यावर तूपाचा हात फिरवा. यानंतर त्यात थोडा मैदा टाकून डस्टिंग करून घ्या. म्हणजेच डब्यावर मैद्याचा पातळ थर शिंपडून घ्या.
५. ५ ते ७ मिनिटांनंतर बिस्कीटांच्या मिश्रणात अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाका. पुन्हा एकदा थोडंसं दूध टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. हे मिश्रण साधारण १ मिनिट एकाच दिशेने फेटून घ्यावं. यामुळे केक छान स्पाँजी बनेल.
हिवाळ्यात आजारपण टाळण्यासाठी 'हे' ५ पदार्थ खा, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय
६. आता हे मिश्रण डस्टिंग केलेल्या डब्यात टाका. त्यावरून बारीक कापलेला तुमच्या आवडीचा सुकामेवा आणि टुटीफ्रुटी घाला आणि तो डबा १५ मिनिटांसाठी प्री हिट केलेल्या कढईत किंवा कुकरमध्ये ठेवून द्या. १५ मिनिटांनी केक व्यवस्थित बेक झाला की नाही ते तपासून पाहा.