Lokmat Sakhi >Food > कडू कारले तुफान आवडेल, करा कारल्याची झटपट चटणी! भाजी नको चटणी खा..पाहा रेसिपी...

कडू कारले तुफान आवडेल, करा कारल्याची झटपट चटणी! भाजी नको चटणी खा..पाहा रेसिपी...

Bitter Gourd Dry Chutney Recipe : Karela Dry Chutney : कारल्याची भाजी आवडत नाही, कारल्याची सुकी चटणी टेस्ट करा, बोरिंग कारल्याला चटपटीत टच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 11:36 AM2023-02-27T11:36:40+5:302023-02-27T11:37:23+5:30

Bitter Gourd Dry Chutney Recipe : Karela Dry Chutney : कारल्याची भाजी आवडत नाही, कारल्याची सुकी चटणी टेस्ट करा, बोरिंग कारल्याला चटपटीत टच...

Bitter Gourd Dry Chutney Recipe : Karela Dry Chutney | कडू कारले तुफान आवडेल, करा कारल्याची झटपट चटणी! भाजी नको चटणी खा..पाहा रेसिपी...

कडू कारले तुफान आवडेल, करा कारल्याची झटपट चटणी! भाजी नको चटणी खा..पाहा रेसिपी...

कारलं म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच नाकं मुरडतात. न आवडणाऱ्या भाज्यांच्या लिस्टमध्ये कारल्याच नाव सगळ्यांत पाहिलं येत असेल. कारल्याच्या कडवट, तुरट चवीमुळे कित्येकांना कारलं खाणं फारस आवडत नाही. भरलेली कारली, कारल्याचे काप, कारल्याची भाजी असे वेगवेगळ्या प्रकारे कारल्याचे पदार्थ आपण बनवतो. पचनसंस्थेचे विकार, भूक न लागणे, पोटदुखी, ताप अशा अनेक आजारांवर कारल्याचे सेवन फायदेशीर ठरते. कारल्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य चांगले राहते, केसांना चमक येते असे हे बहुगुणी कारलं थोड्या प्रमाणांत खाल्लं पाहिजेच. 

अशा परिस्थिती, घरातल्या प्रत्येकाला कारलं कसं खायला द्याव हा प्रश्न घरच्या गृहिणीला पडतो. घरातील व्यक्ती कारल्याची भाजी एकवेळ खाणार नाहीत. परंतु कारल्याची चटकदार सुकी चटणी दिली तर जेवताना चार घास जास्तच जेवतील. कारल्याच्या सीझनमध्ये भरपूर कारलं आणून आपण त्याच्या चकत्या तयार करून, छान ऊन्हात वाळवून ठेवतो. या चकत्या अनेक महिने साठवून ठेवल्या जातात आणि पाहिजे तेव्हा तळून खाल्ल्या जातात. कारल्याचा चकत्यांप्रमाणेच आपण कारल्याची चटकदार, चटपटीत सुकी चटणी तयार करुन ठेवू शकतो. कारल्याची भाजी खाल्ली जात नाही मग कारल्याची सुकी चटणी ट्राय करुन पाहा(Bitter Gourd Dry Chutney Recipe : Karela Dry Chutney).

साहित्य :-

१. कारले - ३ (किसून बारीक करुन घेतलेले) 
२. तेल - १ टेबलस्पून 
३. जिरं - १ टेबलस्पून 
४. हिंग पावडर - १/४ टेबलस्पून 
५. शेंगदाणे - २ टेबलस्पून (जाडसर भरडून घेतलेले)
६. खोबर - १/२ कप 
७. तीळ - १ टेबलस्पून 
८. हळद - १/४ टेबलस्पून 
९. लाल मिरची पावडर - १, १/२ टेबलस्पून 
१०. साखरेची पावडर  - २ टेबलस्पून (साखर हलकेच मिक्सरला लावून त्याची पावडर करावी.) 
११. लिंबाचा रस - २ टेबलस्पून 
१२. मीठ - चवीनुसार 
१३. चाट मसाला - १/४ टेबलस्पून

सुप्रसिद्ध शेफ तारला दलाल यांच्या इंस्टाग्राम पेजवरुन कारल्याची झटपट होणारी सुकी चटणी कशी करायची, याचा  व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  

कृती :- 

१. सर्वप्रथम कारल्याचे लहान तुकडे कापून ते काही काळासाठी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावेत. जेणेकरून कारल्याचा कडूपणा चटणीत उतरणार नाही. त्यानंतर कारल्याच्या लहान तुकड्यांचा किसणीवर किसून किस तयार करुन घ्यावा.   
२. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरं, हिंग, किसून बारीक केलेले कारले घालावे. हे सगळे जिन्नस गरम पॅनमध्ये ८ ते १० मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यावेत. (कारल्यातील पाण्याचा अंश संपूर्ण निघून जाईपर्यंत पॅनमध्ये कारल्याचा किस भाजून घ्यावा.)

३. आता या मिश्रणात जाडसर भरड करुन घेतलेले भाजलेले शेंगदाणे, किसून घेतलेल खोबर, तीळ, हळद, लाल मिरची पावडर, साखरेची पावडर, लिंबाचा रस घालावेत.  
४. त्यानंतर सगळ्यांत शेवटी यात चवीनुसार मीठ व चाट मसाला घालावा. चमच्याच्या मदतीने कारल्याची सुकी चटणी व्यवस्थित एकजीव करुन घ्यावी. 

कारल्याची सुकी चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी आपण एका काचेच्या हवाबंद बरणीत व्यवस्थित स्टोअर करुन ठेवू शकता. आपल्याला हवी तेव्हा आपण ही चटणी जेवताना तोंडी लावायला म्हणून घेऊ शकता.

Web Title: Bitter Gourd Dry Chutney Recipe : Karela Dry Chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.