कारलं म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाक मुरडतात खूप कमी लोकांना कारलं खायला आवडतं. त्यातही भरलेली कारली आवडीनं खाल्ली जातात. (Cooking Tricks and Tips) वरण भातासोबत खायला किंवा जेवताना तोंडी लावणीसाठी तुम्ही कुरकुरीत, खमंग कारल्याचे काप ट्राय करू शकता. हे काप खाताना तुम्हाला कारल्याचा कडवटपणा अजिबात जाणवणार नाही. १० ते १५ मिनिटात ही कुरकुरीत रेसेपी खायला तयार होते. (How to make karlyache kap)
साहित्य
१ ते २ कारली
मसाला
मीठ
हळद
तेल
लिंबाचा रस (गरजेनुसार)
1) सगळ्यात आधी कारली स्वच्छ धुवून घ्यावीत व त्याच्या गोल चकत्या कराव्यात. बीया तुम्हाला हव्या असतील तर तशाच ठेवू शकता.
2) कारल्याच्या चकत्यांना हळद, मसाला, मीठ, लिंबाचा रस लावून घ्या.
3) तवा गरम झाल्यानंतर तेल गरम करून चकत्या मंद आचेवर तळून घ्या
४) एक बाजू शिजली की दुसरी बाजू पलटी करून कुरकुरीत होईपर्यंत परतवा तयार आहेत कारल्याचे कुरकुरीत काप