Lokmat Sakhi >Food > कारल्याच्या चटपटीत भाजीची खास रेसिपी! कडवटपणा अजिबात जाणवणार नाही, मुलंही आवडीने खातील

कारल्याच्या चटपटीत भाजीची खास रेसिपी! कडवटपणा अजिबात जाणवणार नाही, मुलंही आवडीने खातील

How To Make Karela Sabji : कडू म्हणून कारल्याची भाजी खाणं टाळत असाल तर ही खास रेसिपी एकदा ट्राय करून पाहा... मिटक्या मारत घरातले सगळे कारल्याची भाजी संपवतील. (karlyachi bhaji recipe in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 02:46 PM2024-07-12T14:46:08+5:302024-07-12T14:47:00+5:30

How To Make Karela Sabji : कडू म्हणून कारल्याची भाजी खाणं टाळत असाल तर ही खास रेसिपी एकदा ट्राय करून पाहा... मिटक्या मारत घरातले सगळे कारल्याची भाजी संपवतील. (karlyachi bhaji recipe in marathi)

bitter melon sabji recipe, karlyachi bhaji recipe in marathi, how to make karela sabji  | कारल्याच्या चटपटीत भाजीची खास रेसिपी! कडवटपणा अजिबात जाणवणार नाही, मुलंही आवडीने खातील

कारल्याच्या चटपटीत भाजीची खास रेसिपी! कडवटपणा अजिबात जाणवणार नाही, मुलंही आवडीने खातील

Highlightsअशा पद्धतीने केलेली कारल्याची भाजी मुळीच कडू होणार नाही. 

कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच... असं तुम्हाला वाटत असेल तर या एका खास रेसिपीने एकदा कारल्याची भाजी करून पाहा. या पद्धतीने केलेली भाजी मुळीच कडू होणार नाही. घरातले सगळेच जण अगदी आवडीने खातील. लहान मुलं कारल्याची भाजी खाणं टाळतात (bitter melon sabji recipe). पण या पद्धतीने एकदा त्यांना कारल्याची भाजी देऊन पाहा (how to make karela sabji ). ती देखील हौशीने पुन्हा पुन्हा घेऊन खातील...(karlyachi bhaji recipe in marathi)

कारल्याची चटपटीत भाजी करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ मध्यम आकाराचे कारले

एक ते दिड टेबलस्पून चिंच

३ टेबलस्पून गूळ

पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर रंगाचे डाग पडले? फक्त २ पदार्थ लावा, डाग पुर्णपणे गायब होतील... 

२ टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट

चवीनुसार मीठ

१ टीस्पून धने- जीरे पूड

२ टीस्पून लाल तिखट

फोडणीसाठी तेल, हिंग, माेहरी, हळद

 

कृती 

सगळ्यात आधी कारल्याच्या गोलाकार चकत्या करून घ्या आणि त्याच्यातल्या बिया काढून टाका.

यानंतर १५ ते २० मिनिटांसाठी कारले पाण्यामध्ये टाकून ठेवा.

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

तोपर्यंत चिंच आणि पाणी एकत्र गरम करून तिचा कोळ काढून घ्या. 

आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई तापल्यानंतर फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यावर कारल्याच्या फोडी कढईत टाकून परतून घ्या.

 

फोडी चांगल्या परतून झाल्या की त्यामध्ये चिंचेचा कोळ आणि मीठ टाका आणि पुन्हा चिंचेच्या पाण्यात काही वेळ कारल्याच्या फोडी वाफवून घ्या. यामुळे चिचेंचा अंबटपणा कारल्यात मुरतो आणि कारल्याचा कडवटपणा कमी होतो.

प्रिटी झिंटाप्रमाणेच हिमाचल प्रदेशच्या बहुतांश लोकांची त्वचा असते गुलाबी- चमकदार! बघा त्यामागचं सिक्रेट.....

यानंतर मग त्यामध्ये दाण्याचा कूट, गूळ, तिखट, धने आणि जीरेपूड टाका आणि झाकण ठेवून भाजीला चांगली वाफ येऊ द्या. अशा पद्धतीने केलेली कारल्याची भाजी मुळीच कडू होणार नाही. 

 

Web Title: bitter melon sabji recipe, karlyachi bhaji recipe in marathi, how to make karela sabji 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.