Lokmat Sakhi >Food > Christmas 2023 : कुकरमध्ये करा बेकरीसारखा ब्लॅक फॉरेस्ट केक; एगलेस केक-बिना ओव्हनची सोपी पद्धत

Christmas 2023 : कुकरमध्ये करा बेकरीसारखा ब्लॅक फॉरेस्ट केक; एगलेस केक-बिना ओव्हनची सोपी पद्धत

Christmas 2023 Black Forest Cake in Cooker No egg-No Oven Cake (Cooker madhye cake kasa karaycha) : ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही घरच्याघरी ब्लॅक फॉरेस्टचा केक बनवू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 05:12 PM2023-12-22T17:12:09+5:302023-12-23T10:24:07+5:30

Christmas 2023 Black Forest Cake in Cooker No egg-No Oven Cake (Cooker madhye cake kasa karaycha) : ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही घरच्याघरी ब्लॅक फॉरेस्टचा केक बनवू शकता. 

Black Forest Cake in Pressure Cooker : Black Forest Cake Recipe Using a Pressure Cooker at Home | Christmas 2023 : कुकरमध्ये करा बेकरीसारखा ब्लॅक फॉरेस्ट केक; एगलेस केक-बिना ओव्हनची सोपी पद्धत

Christmas 2023 : कुकरमध्ये करा बेकरीसारखा ब्लॅक फॉरेस्ट केक; एगलेस केक-बिना ओव्हनची सोपी पद्धत

ख्रिसमसचा (Christmas Cake) सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या सणालाा फार काही केले नाही तरी घरातील मंडळींसाठी आणि लहान मुलांसाठी केक आवर्जून बनवले जातात. (How to Make Cake in Pressure Cooker) बाहेरचे महागडे केक्स खायचे म्हटलं तर अनेकदा तेच तेच फ्लेवर्स खाऊन कंटाळा येतो. (Eggless Black Forest Cake Recipe)

ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही घरच्याघरी ब्लॅक फॉरेस्टचा केक बनवू शकता. ओव्हनचा वापर न करता कुकरमध्ये झटपट हा केक बनवणं हा एकदम सोपं आहे. (Christmas Special Cake) घरच्याघरी ब्लॅक फॉरेस्ट केक करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (No egg No Oven Cake)

ब्लॅक फॉरेस्ट केक कुकरमध्ये कसा करायचा? (Black Forest Cake Making Steps in Marathi)

१) सगळ्यात बेससाठी चॉकलेट केक तयार करून घ्या. त्यासाठी कुकरमध्ये किंवा कढईमध्ये मीठ घालून त्यावर स्टॅण्ड ठेवा आणि शिट्टी काढून  कुकरचं झाकण १० मिनिटांसाठी लावून ठेवा. 

२) केक टिनला  तेलाने किंवा बटरने ग्रीस करू त्यावर बटर पेपर घाला. बॅटर तयार करण्यासाठी २ टेबलस्पून तेल, २ टेबलस्पून बटर आणि ४ टेबलस्पून पिठी साखर १ मिनिटं व्यवस्थित फेटून  मिक्स करून घ्या. 

३) १ कप मैदा, ३ टेबलस्पून कोको पावडर, १ टिस्पून बेकिंग पावडर आणि  १टिस्पून बेकिंग सोडा मिसळून गाळून घ्या.  नंतर कोरडे जिन्नस आणि पेस्ट केलेले जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्या.  यात २ ते ३  थेंब व्हेनिला इसेंस घालून पुन्हा एकजीव करून घ्या. हे बॅटर केक टिनमध्ये घाला. 

४) केक टिन व्यवस्थित टॅप करून घ्या.  नंतर एका मीठ घातलेल्या कढईत किंवा कुकरमध्ये ठेवून वरून झाकण लावून घ्या.  ४५ मिनिटांनी फ्लेम ऑफ करून केक टुथपिकच्या साहाय्याने चेक करून घ्या.  केक पूर्णपणे बेक झाल्यानंतर कुकरच्या बाहेर काढून एका कापडाने झाकून ठेवून द्या.

५) चेरीचे लहान लहान तुकडे कापून घ्या. कढईत अर्धा कप पाणी आणि तीन मोठे चमचे साखर  आणि चेरीजचे तुकडे घाला. मध्यम आचेवर साखरचे पाणी उकळू द्या. १ ते दीड मिनिट पुन्हा उकळू द्या. सिरप तयार झाल्यानंतर चेरीजचे तुकडे आणि सिरप  गाळून वेगळे करा. 

६) डार्क चॉकलेट कंम्पाऊंड घेऊन पिलरच्या साहाय्याने  किसून कर्ल्स, चिप्स काढून घ्या.   एका थंड बाऊलमध्ये विपिंग क्रिम घाला. क्रिम फेटण्यासाठी तुम्ही हॅण्ड विस्पर किंवा काटा चमच्याचा वापर करू शकता. क्रिम घट्ट, फोमसारखी होईपर्यंत फेटून घ्या.  जर  क्रिम गोड नसेल तर तुम्ही यात साखर घालू शकता. केक डेकोरेशनसाठी एका स्टार शेपच्या नोजल कोनमध्ये ही क्रिम घाला.  तयार केकचा बटर पेपर काढून केक एका ताटात काढून घ्या.  सुरीने केक ३ भागांमध्ये गोलाकार तयार करून घ्या.

थंडीत करा कढी पकोड्यांचा बेत; कढी अजिबात फुटणार नाही-रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम झटपट बेत

७) केक बोर्डवर थोडी विपिंग क्रिम लावून त्यावर केकची एक स्लाईस ठेवा. त्यावर चेरी शुगर सिरप लावा त्यानंतर विप क्रिम घेऊन केकवर लावून घ्या. त्यावर कापलेल्या बारीक चेरी घाला. केकची दुसरी लेअर ठेवून त्यावर शुगर सिरप घाला आणि विप क्रिम लावून घ्या. 

१ वाटी पोह्यांची करा कुरकुरीत-काटेरी चकली; २० मिनिटांत खमंग चकली करण्याची सोपी रेसिपी

८) त्यावरही चेरीचे  काप घालून पुन्हा गोलाकार सेट करून घ्यानंतर फायनल सगळ्यात वरची लेअर ठेवा. त्यावरही क्रिम लावून केक सेट करून घ्या.  क्रिमने केकवर फुलं तयार करून घ्या.  केकच्या बाहेरील बाजूला चोको चिप्स लावून घ्या. केकच्या मध्यभागातही चोको चिप्स लावा. फुलांवर एक एक चेरीचा तुकडा ठेवा. तयार आहे ब्लॅक फॉरेस्ट केक.

Web Title: Black Forest Cake in Pressure Cooker : Black Forest Cake Recipe Using a Pressure Cooker at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.