Join us  

हिवाळ्यात खायलाच हवी गावरान कारळ्याची खमंग पौष्टीक चटणी, आरोग्यासाठी उत्तम-करायलाही सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 1:15 PM

Niger Seed Chutney Recipe, Tilkut Maharashtrian chutney recipe : अशा पद्धतीने कारळ्याची खमंग चटणी करून पाहाल, तर तीळकूट न खाणारेही आवडीने खातील..

कोणतीही भारतीय थाळी चटण्यांशिवाय (Chutney) पूर्ण होऊच शकत नाही. तोंडी लावण्यासाठी चटणी हवीच. चटणी असो किंवा पापड, लोणचे. जेवताना तोंडी लावण्यासाठी आपल्याला ताटात चटणी हवीच. चटणी विविध प्रकारची केली जाते. काही जण लसणाची, शेंगदाण्याची, तिळाची चटणी करतात. पण आपण कधी कारळ्याची चटणी करून पाहिली आहे का? कारळ्याला अनेक जण तीळकूट देखील म्हणतात. तर काही घरांमध्ये तीळकुटाची चटणी हमखास केली जाते. कारळं खाण्याचे अनेक फायदे आहेत (Healthy recipe).

यामुळे वजन कमी करण्यास, जखम बरी होण्यास, निद्रानाश, त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी यासह हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी मदत होते (Cooking Tips). पण कारळ्याची चटणी करायची कशी? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. जर आपल्याला घरगुती साहित्यात कारळ्याची चटणी करायची असेल तर, एकदा ही रेसिपी पाहा. आपल्याला ही चटणी नक्कीच आवडेल(Niger Seed Chutney Recipe, Tilkut Maharashtrian chutney recipe).

कारळ्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

तीळकूट

किसलेलं सुकं खोबरं

जिरं

लसूण

दह्याला सुटलेले पाणी खावे की टाकून द्यावे? तज्ज्ञ सांगतात, दह्याला सुटलेल्या पाण्याचं नक्की करायचं काय?

लाल तिखट

मीठ

कृती

सर्वप्रथम पॅन गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात वाटीभर तीळकूट घालून २ ते ३ मिनिटांसाठी भाजून घ्या. भाजलेले तीळकूट एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर पॅनमध्ये छोटी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून भाजून घ्या. भाजून घेतलेलं किसलेलं सुकं खोबरं एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर पॅनमध्ये एक चमचा जिरं, लसणाच्या ७ ते ८ पाकळ्या घालून भाजून घ्या. तीळकुटाच्या बाऊलमध्ये काढून घ्या.

करा प्रेशर कुकरमध्ये पावभाजी, फक्त १ शिट्टी आणि हॉटेलस्टाइल परफेक्ट पावभाजी झटपट तयार!

नंतर त्यात २ चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. शेवटी मिक्सरच्या भांड्यात सर्व भाजलेलं साहित्य घेऊन दरदरीत वाटून घ्या. अशा प्रकारे कारळ्याची चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी भात, चपाती भाकरीसह खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स