Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात नेमके कोणते तीळ खावेत ? काळे की पांढरे ? काय आहेत याचे फायदे...

हिवाळ्यात नेमके कोणते तीळ खावेत ? काळे की पांढरे ? काय आहेत याचे फायदे...

Benefits of Black Sesame : काळ्या तीळामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच घटक असतात आणि त्याचा थंडीच्या दिवसांत शरीराला चांगला फायदा होतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2023 04:10 PM2023-11-15T16:10:33+5:302023-11-15T16:28:53+5:30

Benefits of Black Sesame : काळ्या तीळामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच घटक असतात आणि त्याचा थंडीच्या दिवसांत शरीराला चांगला फायदा होतो...

Black vs white sesame seeds which is better, 7 Reasons To Include Black Sesame Seeds In Your Winter Diet | हिवाळ्यात नेमके कोणते तीळ खावेत ? काळे की पांढरे ? काय आहेत याचे फायदे...

हिवाळ्यात नेमके कोणते तीळ खावेत ? काळे की पांढरे ? काय आहेत याचे फायदे...

थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. आकाराने अगदीच लहान असलेले तीळ पौष्टिक बिया म्हणून ओळखले जातात. हे तीळ आणि तिळाचे पदार्थ फक्त सणांपुरतेच मर्यादित नसतात. रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात तिळ खाणं महत्त्वाचं मानलं जातं. तीळ त्वचेसारख्या नाजूक घटकाचं संरक्षण करण्यापासून ते हदयासारख्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवाचं आरोग्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे असतात. थंडीच्या या  दिवसांत आपण फळं, भाज्या, गूळ, बाजरी तसेच सुकामेवा, तीळ हे पदार्थ आवर्जून खातो. या पदार्थांमुळे शरीराला ऊर्जा मिळायला मदत होते आणि शरीराचे पोषणही होते. हवेत असणाऱ्या गारठ्यामुळे शरीराची जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने आहाराच्या माध्यमातून शरीराला ती ऊर्जा मिळवावी लागते. म्हणूनच संक्रातींच्या काळात तीळ (Can we eat sesame seeds in winter) लावलेली भाकरी, तीळ - गुळाची पोळी, तिळाचे लाडू किंवा वड्या आवर्जून खाल्ले जातात. आपण साधारणपणे पांढरे तीळ खातो. पण काळे तीळ सहसा वापरले जात नाहीत. मात्र काळ्या तीळामध्येही आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच घटक असतात आणि त्याचा थंडीच्या दिवसांत शरीराला चांगला फायदा होतो(Why Black Sesame Seeds are a Must For You in Winter).

हिवाळ्यात काळे तीळ खावेत की पांढरे याबाबत अनेकदा गोंधळ निर्माण होतो. काही लोकांना असे वाटते की काळे तीळ खाणे अधिक आरोग्यदायी आहे तर काहींच्या मते पांढरे तीळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत. काळे किंवा पांढरे असे दोन्ही तीळ हे आपल्याला शरीरारासाठी फारच (Importance of black sesame seeds in winter) उपयुक्त ठरतात. परंतु यातील नेमके कोणते तीळ हिवाळ्यात खाणे अधिक फायदेशीर ठरेल हे बहुतेकांना माहित नसते. यासाठी हिवाळ्यात नेमके पांढरे तीळ खावेत की काळे हे पाहूयात(Heath Benefits Of Black Sesame Seeds: 7 Reasons To Include Black Sesame Seeds In Your Winter Diet).
  
हिवाळ्यात नक्की कोणते तीळ खाणे चांगले ? 

जरी दोन्ही प्रकारचे तीळ भरपूर प्रमाणात पोषक असले आणि ते खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळत असले तरी, हिवाळ्यात आपण काळे तीळ जास्त प्रमाणात खावेत कारण ते जास्त फायदेशीर असतात. काळ्या तिळात पांढऱ्या तिळापेक्षाही जास्त पोषक घटक असतात. हिवाळ्यात तिळापासून बनवलेल्या वस्तूही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. काळ्या - पांढऱ्या तिळाचे लाडू आणि चिक्की खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

गारठ्याच्या थंडीत घरगुती आवळा कँडी खाऊन ठेवा स्वतःला फिट अँड फाईन, घ्या आवळा कँडीची सोपी रेसिपी...

डाळ खाल्ल्याने पोटाच्या समस्या होऊ नये म्हणून डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, डाळ खाऊन पित्त होणार नाही...

हिवाळ्यात काळे तीळच का खावेत ? 

१. पांढऱ्या तीळापेक्षा काळ्या तीळाची साल ही अधिक पौष्टिक असते. काळ्या तीळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हिवाळ्यात पांढरे तीळ खाण्यापेक्षा काळे तीळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. काळ्या तिळाचे लाडू आणि चिक्की खाल्ल्यास हाडांचे आरोग्य सुधारते. काळे तीळ खाल्ल्याने आपल्या शरीरात अधिक ऊर्जा व बळ मिळू शकते. काळे तीळ खमंग, कुरकुरीत आणि चवीला खूपच छान असतात, तर पांढरे तीळ मऊ, गोड असतात.

२. काळ्या तीळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा जास्त ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिड असते, त्यामुळे हृदयासोबतच इतर अनेक अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरते. याशिवाय फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात असतात. हे काळे तीळ अनेक प्रकारच्या जुनाट आजारांपासून आपले संरक्षण करतात.

३. जर आपल्याला हिवाळ्यात वारंवार होणारे संसर्ग किंवा इतर रोग टाळायचे असतील तर काळे तीळ हे जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. हे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते, ज्यामुळे आपले शरीर सहजपणे रोगांशी लढू शकते. 

४. काळे तीळ खाल्ल्याने आपली चयापचय क्रियाही व्यवस्थित सुरळीत सुरु राहते. तसेच त्यात मॅग्नेशियम असल्यामुळे रक्तदाब सुधारतो. जर आपले ब्लड प्रेशर कायम हाय राहत असेल तर आपण काळ्या तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात दररोज समावेश करावा. हे काळे तीळ आपण भाजूनही खाऊ शकता यासोबतच सॅलड, सूपमध्ये देखील आपण हे काळे तीळ घालू शकता. 

५. सध्या डायबिटीस आणि हृदयरोग या अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत. तिळामध्ये असलेले कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम हृदयाच्या कार्यासाठी फायदेशीर असते. तसेच डायबिटीसमुळेही अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी काळे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो.काळे तीळ खाल्ल्याने मेंदूची काम करण्याची क्षमता वाढते याचबरोबर, आपली स्मरणशक्ती वाढण्यास अधिक मदत मिळते. 

शेवयांची खीर नेहमीचीच, दिवाळीत करा शेवयांचे थंडगार कस्टर्ड ! पाडवा आणि भाऊबीज करा स्पेशल...

६. थंडीच्या दिवसांत साधारणपणे पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पोट साफ होण्यासाठी शरीराला जास्तीत जास्त फायबर्सची आवश्यकता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत काळे तीळ खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते. 

७. थंडीच्या दिवसांत साधारणपणे हाडांचे दुखणे डोके वर काढते. अशावेळी हाडांचे दुखणे किंवा सांधेदुखी दूर होण्यासाठी काळे तीळ फायदेशीर ठरतात. तीळामध्ये असलेले कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे घटक हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे थंडीत आवर्जून या तीळांचा आहारात समावेश करायला हवा.

Web Title: Black vs white sesame seeds which is better, 7 Reasons To Include Black Sesame Seeds In Your Winter Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.