Lokmat Sakhi >Food > हरबरे- राजमा खाल्ल्याने पावसाळ्यात पोट टम्म फुगतं- गॅसेस होतात? १ सोपी ट्रिक- त्रास होण्याची भीती नाही

हरबरे- राजमा खाल्ल्याने पावसाळ्यात पोट टम्म फुगतं- गॅसेस होतात? १ सोपी ट्रिक- त्रास होण्याची भीती नाही

Bloating And Gases Problem After Eating Rajma And Chhole: हरबरे किंवा राजमा पचत नाही अशी अनेकांची तक्रार असते. बघा त्यासाठीच एक खास उपाय (cooking tips for rajma and chole)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 09:11 AM2024-06-16T09:11:36+5:302024-06-17T18:17:50+5:30

Bloating And Gases Problem After Eating Rajma And Chhole: हरबरे किंवा राजमा पचत नाही अशी अनेकांची तक्रार असते. बघा त्यासाठीच एक खास उपाय (cooking tips for rajma and chole)

bloating and gases problem after eating rajma and chhole, cooking tips for making rajma and chole, how to cook rajma and chole properly | हरबरे- राजमा खाल्ल्याने पावसाळ्यात पोट टम्म फुगतं- गॅसेस होतात? १ सोपी ट्रिक- त्रास होण्याची भीती नाही

हरबरे- राजमा खाल्ल्याने पावसाळ्यात पोट टम्म फुगतं- गॅसेस होतात? १ सोपी ट्रिक- त्रास होण्याची भीती नाही

Highlightsहा उपाय केल्यानंतर पोट फुगण्याचा किंवा गॅसेस होण्याचा त्रास होणार नाही..

शाकाहारी लोकांच्या जेवणात आधीच प्रोटिन्सची खूप कमतरता असते. ती भरून काढण्यासाठी आहारतज्ज्ञ राजमा, हरबरे असे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. कारण हे दोन्ही पदार्थ प्राेटिन्सचे खूप चांगले स्त्रोत आहेत. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी हे पदार्थ खाल्लेच पाहिजेत. पण बऱ्याच जणांना मात्र हे दोन्ही पदार्थ अजिबात पचत नाहीत (how to cook rajma and chole properly). हरबरे किंवा राजमा खाल्ला की लगेच पोट फुगण्याचा, गॅसेस होण्याचा त्रास होतो. त्यामुळे मग ते हे दोन्ही पदार्थ खाणं टाळतात. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर हा एक सोपा उपाय लगेच करून पाहा.(bloating and gases problem after eating rajma and chhole)

 

हरबरे, राजमा खाऊन गॅसेसचा त्रास होत असल्यास उपाय

हरबरे राजमा खाऊन गॅसेसचा त्रास होत असेल तर काय उपाय करावा, याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ pragya_sydney या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

मोबाईल- सोशल मीडियावर ‘तसलं’ काही आपली मुलं पाहतच नाही, असं वाटतं तुम्हाला? संशोधन सांगते..

यामध्ये हे दोन्ही पदार्थ शिजवताना काय करावं, याविषयी सांगितलं आहे. हे दोन्ही पदार्थ शिजवण्यापुर्वी आपण काही तास पाण्यात भिजत घालतो आणि नंतर लगेच कुकरमध्ये टाकून शिजवून घेतो. या दोन्ही क्रियांच्या मध्ये काय करायला पाहिजे, हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

 

कुकरमध्ये पाणी घाला आणि त्यामध्ये काही तास भिजवलेले राजमा किंवा हरबरे टाका. या पाण्यात थोडं किसलेलं आलं, दालचिनीचा छोटासा तुकडा, मीठ, हिंग आणि कडिपत्त्याची ८ ते १० पानं टाका. या पाण्यात हरबरे आणि राजमा अर्ध्या तासासाठी तसेच राहू द्या आणि त्यानंतर त्याच पाण्यात शिजवून घ्या.

डब्यांचे झाकण, त्यांचे रबर पिवळट- तेलकट झाले? १ खास उपाय, रबर- झाकण होईल नव्यासारखं चकाचक

या सगळ्या घटकांमध्ये हरबरे आणि राजमा यांच्यामध्ये असणारे ॲसिडिक घटक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे हा उपाय केल्यानंतर पोट फुगण्याचा किंवा गॅसेस होण्याचा त्रास होणार नाही, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

Web Title: bloating and gases problem after eating rajma and chhole, cooking tips for making rajma and chole, how to cook rajma and chole properly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.