मिल्क टी, ग्रीन टी, ब्लॅक टी, अशा विविध प्रकारच्या चहा आपण आजपर्यंत पाहिले असतीलच, आणि त्याचा आस्वाद देखील घेतलाच असेल. मात्र, आपण कधी ब्लू टी बद्दल ऐकले आहे का? ब्लू टी ही पूर्णपणे हर्बल टी असते. हे शंखपुष्पी निळं फूल असतं. ज्याला इंग्रजीमध्ये Asian pigeonwings असं म्हणतात. या फुलांपासून चहा बनवली जाते. या चहाला बटरफ्लाय टी देखील म्हणतात. ब्लू टी दक्षिण- पूर्व आशियामध्ये सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. हा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या ब्लू टीला ॲण्टीऑक्सिडण्ट पॉवर हाऊस देखील म्हणतात. या चहामुळे प्रतिकारशक्ती वाढते.
डायबिटीसपासून संरक्षण
डायबिटीस असलेल्या व्यक्तींना चहा पिता येत नाही. मात्र, ब्लू टी डायबिटीज लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. शरीरात ब्लड शुगर आणि ग्लुकोज मॅनेज करण्यात ब्लू टी सर्वोत्तम आहे. शरीरात कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन झाल्यास ही चहा ते इंफेक्शन कमी करते. दररोज कमीत कमी दोन कप ब्लू टी प्यायला पाहिजे. ब्लू टीमध्ये स्ट्रेस लेव्हल कमी करण्याचा गुण असतो. ज्यामुळे तणाव कमी होतो.
स्किन आणि केसांसाठी लाभदायक
ब्लू टीमध्ये ॲण्टीऑक्सिडण्ट अधिक प्रमाणावर आहे, ज्यामुळे आपली स्किन आणि केसांमध्ये एक नवी चमक येते. या टीमध्ये व्हिटामिन आणि मिनरल देखील आहेत. जे ॲण्टी एजिंगचं काम करतात, ज्याने चेहऱ्यावर चमक आणि केसांना मजबुती मिळते.
डोळ्यांसाठी गरजेचं
डोळ्यांना होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या त्रासावर ब्लू टी खूप काम करतं. यात उपस्थित ॲण्टीऑक्सिडण्ट डोळ्यातील पेशीत ब्लड सर्कुलेशन वाढवते. यामुळे डोळे चांगले राहतात. मोतीबिंदू, कमकुवत दृष्टी, रेटिनलशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी चहा मदतगार आहे.
पोट आणि आतड्यांची सफाई
ब्लू टी लिव्हर, किडनी, पोट आणि आतड्यांची सफाई करण्यास मदत करते. हा चहा आपलं शरीर डिटॉक्स करते. यूटीआय किंवा यूरिनशी संबंधित काही त्रासांसाठी हा चहा खूप फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
ब्लू टी मेटाबॉलिज्मशी संबंधित त्रास दूर करते. मेटाबॉलिक रेट अधिक असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप मदतगार आहे. एवढंच नाही तर हे लिव्हरची सूज देखील कमी करते. याव्यतिरिक्त मायग्रेनच्या रूग्णांनी रोज सकाळी हा चहा प्यायल्यास त्यांना मायग्रेनचा झटका येणं कमी होतं. ब्लू टी स्ट्रेस, अॅसिडीटी कमी करून ब्लड सर्कुलेशन वाढवते. ज्यामुळे मेंदूत रक्ताचा प्रवाह चांगला राहतो आणि मायग्रेन अॅटक येत नाही.