Lokmat Sakhi >Food > केवळ १ सोपी ट्रिक वापरून फक्त ५ मिनिटांत उकडता येतील बटाटे

केवळ १ सोपी ट्रिक वापरून फक्त ५ मिनिटांत उकडता येतील बटाटे

Boil potatoes in just 5 minutes using just one simple trick : बटाटे पटकन उकडण्याची एक सोपी युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 05:27 PM2023-01-25T17:27:46+5:302023-01-25T17:50:11+5:30

Boil potatoes in just 5 minutes using just one simple trick : बटाटे पटकन उकडण्याची एक सोपी युक्ती

Boil potatoes in just 5 minutes using just one simple trick... | केवळ १ सोपी ट्रिक वापरून फक्त ५ मिनिटांत उकडता येतील बटाटे

केवळ १ सोपी ट्रिक वापरून फक्त ५ मिनिटांत उकडता येतील बटाटे

बटाटा हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. बटाटा वापरून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. बटाट्यापासून भाजी, समोसा, पॅटीस, वेफर्स, पापड, बटाटेवडा, भजी, पराठे, मिक्स भाजी, पावभाजी असे पदार्थ करतात. उपवासाच्या पदार्थांमध्येही बटाटे वापरले जातात. बटाटा हा प्रोटीन,लोह, कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन ‘ए’, व्हिटॅमिन ‘ब’ आणि व्हिटॅमिन ‘क’ ने युक्त असतो. बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च आणि इतर कर्बोदके असतात. बटाट्याचा पृष्ठभाग सामान्यतः हलका तपकिरी किंवा पिवळसर असतो आणि आतील भाग पांढरा किंवा पिवळसर असतो.

पोषक तत्वांच्या बाबतीत बटाटा हा अत्यंत समृद्ध कंदमुळ मानलं जातं. याच कारणामुळे बटाट्याला भाज्यांचा राजा मानलं जातं. कित्येक भाज्या किंबहुना सर्वच भाज्या बटाट्याशिवाय अपूर्णच वाटतात. असा हा बहुउपयोगी बटाटा उकडून त्यापासून अनेक चविष्टय पदार्थ बनविले जातात. बटाटा उकडताना तो झटपट केवळ ५ मिनिटांत कसा उकडून घेऊ शकतो. यासाठीची एक सोपी ट्रिक शिकून घेऊया(Boil potatoes in just 5 minutes using just one simple trick).

बटाटा पटकन उकडवून घेण्यासाठी वापरा एक सोपी ट्रिक... 

बटाट्यांपासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये काहीवेळा बटाटे उकडवून घ्यावे लागतात. बटाटे उकडताना काहीवेळा बटाटे नीट उकडले जात नाहीत. कधी बटाटे खूपच उकडून पचपचीत होतात किंवा काहीवेळा अर्धवट उकडले जातात. अशावेळी बटाट्यांपासून तयार केला जाणारा पदार्थ बनवताना फसू शकतो. म्हणून बटाटे व्यवस्थित उकडून घेणे गरजेचे असते. झटपट बटाटे उकडून जर आपल्याला एखादा पदार्थ बनवायचा असेल तर बटाटे केवळ ५ मिनिटांत उकडवून घेण्याची एक सोपी ट्रिक समजून घेऊयात.  

gobblegrams या इंस्टाग्राम पेजवरून झटपट बटाटे उकडवून घेण्याची एक सोपी ट्रिक सांगितली आहे, ती ट्रिक समजून घेऊयात. 

कृती :- 

१. एका बाऊलमध्ये बटाटे घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावेत. 
२. त्यानंतर काटा चमच्याच्या मदतीने त्याला छोटे - छोटे होल पाडून घ्यावेत. 
३. हे बटाटे एका बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये ४ ते ५ चमचे पाणी घालून घ्यावे. 
४. आता या बाऊलवर एक डिश ठेवून झाकून घ्यावे. 
५. हा बाऊल मायक्रोव्हेव्हमध्ये ५ मिनिटांकरिता ठेवून द्यावा. 

 बटाटे झटपट ५ मिनिटांत उकडून तयार होतील.

Web Title: Boil potatoes in just 5 minutes using just one simple trick...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.