Join us  

‘बाँबे चटणी’ खाल्लीच नसेल तर काय मजा? २ चमचे पिठात होते झटपट चविष्ट चटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 1:13 PM

Bombay Chutney| Gram Flour Chutney वडापाव ते धिरडं कशाही सोबत चविष्ट लागले मस्त चमचमीत बॉँबे चटणी

जेवताना तोंडी लावण्यासाठी जर चटणी असेल तर जेवणाची रंगत वाढते. चटणी अनेक प्रकारची केली जाते. सुकी असो किंवा ओली दोन्ही प्रकारच्या चटणीला पसंती लोकांकडून मिळते. हिरवी, लाल, खोबऱ्याची, शेंगदाण्याची, तिळाची, कांद्याची, मिरचीची चटणी आपण खाल्लीच असेल, पण आपण कधी बाँबे चटणी खाल्ली आहे का?

बेसानापासून तयार ही चटणी वडापाव, समोसा पाव, पुरी, चपाती किंवा इतर स्नॅक्ससह खाल्ली जाते. मुख्य म्हणजे ही चटणी मुंबईच्या वडापावसह खायला दिली जाते. ही रेसिपी कमी साहित्यात तयार होते. बाँबे चटणीला बेसन चटणी देखील म्हणतात. चला तर मग या टेस्टी - स्पाईसी चटणीची कृती पाहूयात(Bombay Chutney| Gram Flour Chutney).

बाँबे चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

पाणी

मोहरी

जिरं

लाल सुकी मिरची

हिरवी मिरची

उडीद डाळ

चणा डाळ

कडीपत्ता

भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढायला वेळ लागतो? शेफ रणबीर ब्रार सांगतात १ सोपी ट्रिक

हिंग

कांदा

टोमॅटो

हळद

मीठ

कोथिंबीर

लिंबाचा रस

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ टेबलस्पून बेसन घ्या, त्यात २ कप पाणी घालून मिक्स करा. त्यात गुठळ्या तयार होणार नाही याची काळजी घ्या. दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरं, उडीद डाळ, चणा डाळ, लाल सुक्या मिरच्या, कडीपत्ता, चिमुटभर हिंग घालून मिक्स करा. आता त्यात एक लांब चिरलेला कांदा घालून लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.

गावरान पद्धतीने करा लाल तिखट घालून चमचमीत पिठलं, चव अशी की येईल गावकडची आठवण

कांदा लालसर झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेलं आलं, एक उभी चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करा. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा.

आता त्यात बेसनाचे तयार पीठ घालून मिक्स करा. व त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. उकळी आल्यानंतर झाकण काढा. आता त्यावर कोथिंबीर आणि एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. अशा प्रकारे बाँबे चटणी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स